जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'काही मंत्र्यांना इंग्रजी येत नाही तर काहींना हिंदी, मुख्य सचिवांची करावी बदली', CM नी केली अमित शाहांकडे मागणी

'काही मंत्र्यांना इंग्रजी येत नाही तर काहींना हिंदी, मुख्य सचिवांची करावी बदली', CM नी केली अमित शाहांकडे मागणी

'काही मंत्र्यांना इंग्रजी येत नाही तर काहींना हिंदी, मुख्य सचिवांची करावी बदली', CM नी केली अमित शाहांकडे मागणी

मिझोराममध्ये मिझो ही भाषा बोलली जाते. मिझोराम राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केंद्रात कोणत्याही पक्षाचं सरकार असलं, तरी मिझोराममध्ये मुख्य सचिव नेमताना त्याला मिझो भाषेचं ज्ञान असल्याची खात्री करूनच नियुक्ती केली जात असे. या वेळी मात्र मिझोराममध्ये हा निकष पाळला गेला नाही

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: हिंदी ही राज्यकारभाराची भाषा म्हणून म्हणून देशाने स्वीकारलेली आहे. तसंच, प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याची भाषा राज्यकारभारासाठी वापरली जाते. साहजिकच राज्यकारभार करणारे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनाही ती अवगत असणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या राज्याची भाषा समजत नसलेल्या मुख्य सचिवांची (Chief Secretary) बदली करावी आणि मिझो भाषेचं (Mizo Language) ज्ञान असलेल्याच अधिकाऱ्याची मुख्य सचिवपदी नियुक्ती करावी, अशी मागणी मिझोरामचे (Mizoram) मुख्यमंत्री पू जोरामथांगा (Pu Zoramthanga) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 29 ऑक्टोबरला जोरमथांगा यांनी हे पत्र लिहिले आहे. NDTV ने या पत्राच्या कॉपीच्या आधारे याबाबत वृत्त दिले आहे. मिझोराममध्ये मिझो ही भाषा बोलली जाते. मिझोराम राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केंद्रात कोणत्याही पक्षाचं सरकार असलं, तरी मिझोराममध्ये मुख्य सचिव नेमताना त्याला मिझो भाषेचं ज्ञान असल्याची खात्री करूनच नियुक्ती केली जात असे. या वेळी मात्र मिझोराममध्ये हा निकष पाळला गेला नाही. ज्या व्यक्तीला स्थानिक राज्यकारभाराची भाषा येत नाही, त्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे त्या राज्यात नियुक्त केलं जात नाही, असा संकेत आहे. कारण ती व्यक्ती प्रभावीपणे कारभार करू शकत नाही. म्हणून मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांची बदली करण्याची मागणी केली आहे. ‘आम्ही एनडीएचे विश्वसनीय सहयोगी आहोत. त्यामुळे आमच्या मागणीवर केंद्र सरकार नक्की विचार करील, असा विश्वास वाटतो,’ असं जोरामथांगा यांनी म्हटलं आहे. हे वाचा- BREAKING : भोपाळमध्ये शासकीय रुग्णालयात अग्नितांडव, 3 लहान मुलांचा मृत्यू मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे, ‘लालुनमाविया चुआगो हे गुजरात केडरचे आयएएस अधिकारी मिझोरामच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव जेसी रामथांगा यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करावं, अशी मागणी मी केली होती. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने रेणू शर्मा (Renu Sharma) यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. रेणू AGMUT केडरच्या 1988च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारने 28 ऑक्टोबरला त्यांची नियुक्ती केली आणि एक नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्याच दिवशी मिझोराम सरकारने जेसी रामथांगा (Jecy Ramthanga) यांना एक नोव्हेंबरपासून मुख्य सचिव पदाचा कार्यभार सांभाळण्याचा आदेश जारी केला होता. त्यामुळे मिझोराममध्ये सद्यस्थितीत दोन मुख्य सचिव आहेत.’ हे वाचा- संत्री विकणारे हरेकाला यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्काराने केला सन्मान ‘मिझोराममधल्या बहुतांश नागरिकांना हिंदी भाषा येत नाही. माझ्या मंत्रिमंडळातल्या एकाही मंत्र्याला हिंदी भाषा येत नाही. त्यापैकी काही जणांना तर इंग्रजी भाषाही समजत नाही. या पार्श्वभूमीवर मिझो भाषेचं ज्ञान नसलेला मुख्य सचिव त्याचं काम प्रभावीपणे करू शकणार नाही. त्यामुळे मिझो भाषा जाणणाऱ्या नव्या मुख्य सचिवांची राज्यात नियुक्ती केली जाणं आवश्यक आहे,’ अशी मागणी पू जोरामथांगा यांनी पत्राद्वारे केली आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालय यावर काय निर्णय घेतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात