• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • संत्री विकणारे हरेकाला यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्काराने केला सन्मान

संत्री विकणारे हरेकाला यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्काराने केला सन्मान

हजब्बा यांनी कधीच शाळेत जाऊन शिक्षण घेतलं नाही. मात्र त्यांच्या पुढाकारामुळे अनेक मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली झाली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : मंगळुरूमध्ये संत्री विकणाऱ्या 64 वर्षीय हरेकाला हजब्बा (Harekala Hajabba) यांना सोमवारी पद्मश्री (Padma Shri) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हजब्बा यांना हा सन्मान शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी देण्यासाठी आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी राष्ट्रपति भवनातील दरबार हॉलमध्ये हजब्बा यांना देशातील सर्वात मोठा प्रतिष्ठित सन्मानापैकी एक पद्मश्री देऊन गौरव केला. अक्षर संत म्हणून ओळखले जाणारे हजब्बा यांनी कधीच शाळेत जाऊन शिक्षण घेतलं नाही. मात्र त्यांच्या पुढाकारामुळे अनेक मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली झाली. (Harekala Hajabba who sells oranges honored with the Padma Shri award for his social work) कर्नाटकातील दक्षिण कन्नडाच्या न्यूपाड़ापू गावात राहणारे हरेकाला हजब्बा यांनी आपल्या गावात कमवलेल्या पैशातून एक शाळा सुरू केली आहे. याशिवाय ते दरवर्षी आपल्या बचतीतील संपूर्ण हिस्सा शाळेच्या विकासासाठी देतात. हजब्बा यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा 25 जानेवारी 2020 मध्ये झाली होती. मात्र कोरोना व्हायरस महासाथीमुळे या समारंभाचं आयोजन करण्यात येऊ शकत नव्हतं. 1995 मध्ये सुरू झाला होता प्रवास मंगळुरूचे राहणारे एक अशिक्षित फळ विक्रेता हजब्बा यांनी शहरापासून 35 किमी दूर आपलं गाव न्यूपड़ापूमध्ये गावातील मुलांसाठी एक शाळा सुरू केली आहे. गावात शाळा नसल्यामुळे येथील मुलांच्या भविष्याचा विचार करताना त्यांनी स्वत: हे आव्हान घेतलं. 1999 मध्ये त्यांच्या शाळेला परवानगी देण्यात आली. हे ही वाचा-What an Idea! या दुकानात गरजूंना 1 रुपयांत मिळतात stylish कपडे सुरुवातचील एक मशिदीत ही शाळा सुरू होती. त्यानंतर हजब्बाने जिल्हा प्रशासनाकडून 40 सेंट जमीन मिळाल्यानंतर त्यांनी क्लासरूम उभारले. संत्री विकून त्यांना जी रक्कम मिळत होती, ती त्यांनी शाळा उभारण्यासाठी लावली. येत्या काळात गावात एक प्री युनिवर्सिटी कॉलेज उभारावं अशी त्यांची इच्छा आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: