मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING : भोपाळमध्ये शासकीय रुग्णालयात अग्नितांडव, 3 लहान मुलांचा मृत्यू

BREAKING : भोपाळमध्ये शासकीय रुग्णालयात अग्नितांडव, 3 लहान मुलांचा मृत्यू

या रुग्णालयातील कमला नेहरू या नवजात बाळांच्या वार्डमध्ये ही आग लागली.

या रुग्णालयातील कमला नेहरू या नवजात बाळांच्या वार्डमध्ये ही आग लागली.

या रुग्णालयातील कमला नेहरू या नवजात बाळांच्या वार्डमध्ये ही आग लागली.

  • Published by:  sachin Salve

भोपाळ, 09 नोव्हेंबर : राज्यात अहमदनगरमध्ये शासकीय रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असताना मध्य प्रदेशमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भोपाळमध्ये (bhopal)  एका हमीदिया शासकीय रुग्णालयात (Hamidia Hospital) भीषण आग (Fire) लागली. या आगीत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

भोपाळमधील सर्वात मोठ्या  हमीदिया  शासकीय रुग्णालयात सोमवारी रात्री भीषण आग लागली. रुग्णालयातील लहान मुलांसाठी तयार केलेल्या कमला नेहरू विभागाच्या (Kamala Nehru ) तिसऱ्या मजल्यावर आग लागली. या आगीत तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. .

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आगीमुळे नवजात बाळ भाजली आहे. नवाज बाळ आणि डॉक्टर्स अद्याप वॉर्डमध्ये अडकलेली आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.  घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.  मंत्री विश्वास सारंग या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. स्थानिक लोक आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमध्ये ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्वीट करून या घटनेबद्दल दु: ख व्यक्त केलं आहे. या रुग्णालयातील कमला नेहरू रुग्णालयाच्या नवजात बाळांच्या वार्डमध्ये ही आग लागली. बचावकार्य सुरू आहे पण आधीपासून गंभीर आजारी असलेल्या ३ मुलांवर उपचार सुरू होते, पण त्यांना वाचवू शकलो नाही. आगीवर नियंत्रण मिळवले आहे, अशी माहिती चौहान यांनी दिली. तसंच, या घटनेच्या चौकशीचे आदेश सुद्धा चौहान यांनी प्रशासनाला दिले आहे.

First published: