मराठी बातम्या /बातम्या /देश /

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक, फोटो आणि नावात छेडछाड

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक, फोटो आणि नावात छेडछाड

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Cabinet Minister Jyotiraditya Scindia) यांचं इन्स्टाग्राम अकाउंट काही काळ हॅक (Hack) झालं होतं. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये हॅकरने शिंदे यांचं नाव आणि फोटोशी छेडछाड केली होती.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Cabinet Minister Jyotiraditya Scindia) यांचं इन्स्टाग्राम अकाउंट काही काळ हॅक (Hack) झालं होतं. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये हॅकरने शिंदे यांचं नाव आणि फोटोशी छेडछाड केली होती.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Cabinet Minister Jyotiraditya Scindia) यांचं इन्स्टाग्राम अकाउंट काही काळ हॅक (Hack) झालं होतं. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये हॅकरने शिंदे यांचं नाव आणि फोटोशी छेडछाड केली होती.

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Cabinet Minister Jyotiraditya Scindia) यांचं इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram ID) शनिवारी (4 डिसेंबर) काही काळ हॅक (Hack) झालं होतं. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये हॅकरने शिंदे यांचं नाव आणि फोटोशी छेडछाड केली होती. आयटी सेलला याबाबतची माहिती मिळताच आयटी सेलने तातडीने शिंदे यांचं प्रोफाइल रिकव्हर केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यांच्या नावाऐवजी श्रेया अरोरा असं नाव त्यावर लिहिलं. हॅकरने नावासह त्यांच्या फोटोचा आकार आणि स्टाइलमध्येही फेरफार केला. फोटो आणि नावाव्यतिरिक्त प्रोफाइलमधल्या अन्य माहितीत कोणताही फेरफार करण्यात आलेला नाही. शिंदे यांच्या प्रोफाइलमध्ये छेडछाड केल्याचा प्रकार सर्वप्रथम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती केंद्रीय मंत्र्यांच्या आयटी कार्यालयाला दिली. आयटी सेलने एका तासाच्या आत अकाउंट रिकव्हर केलं.

ऑगस्टमध्ये फेसबुक अकाउंट झालं होतं हॅक

केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये (Social Media Account) फेरफार होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी त्यांचं फेसबुक अकाउंट हॅक (Facebook Account Hack) करण्यात आलं होतं. हा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला होता. मार्च 2020 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या शिंदे यांचा ऑगस्टमध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक विभागाची (Civil Aviation Department) जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी हॅकरने त्यांचं अकाउंट हॅक करून एक जुना व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत ते मोदी सरकारच्या उणिवा मांडताना दिसत होते. जेव्हा शिंदे काँग्रेसमध्ये होते, तेव्हाचा हा व्हिडिओ होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रारदेखील देण्यात आली होती. त्या वेळीदेखील अकाउंट हॅक झाल्याची माहिती मिळताच काही तासांतच अकाउंट रिकव्हर करण्यात आलं होतं.

मोदींचा भाजप खासदारांना इशारा, म्हणाले 'स्वत:मध्ये वेळीच बदल करा अन्यथा...

रिपोर्ट कार्ड

न्यूज 18 इंडिया चौपालच्या मंचावर बोलताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं, की `नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारताना मी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला होता. येत्या 12 डिसेंबर रोजी हे 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्या दिवशी मी माझं रिपोर्ट कार्ड (Report Card) सादर करणार आहे.`

सरपंचांचे पंतप्रधानांना साकडे, मोदींच्या दौऱ्यापूर्वी केली रिटर्न गिफ्टची मागण

`कोरोनाच्या (Corona) नव्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटबाबत (Omicron Variant) सर्वांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. जनतेला सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही 11 आफ्रिकी देशांची यादी तयार केली आहे. या देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) केली जाईल. ओमिक्रॉन प्रभावित देशांमधून सुमारे साडेपाच हजार प्रवासी एका दिवसापूर्वी देशात दाखल झाले होते. त्यांची चाचणी करण्यात आली आहे. तपासणीला वेळ लागत असल्याचा प्रश्न दोन ते तीन दिवसांत सुटेल,` असं केंद्रीय मंत्री शिंदे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Instagram, Jyotiraditya scindia, Social media