नवी दिल्ली, 7 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत सर्व खासदारांना हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी तुम्हाला नेमहीच संसदेत उपस्थित राहण्यास सांगत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना घरातील काही काम करण्यास सांगतात आणि ते जेव्हा करत नाहीत तेव्हा तुम्हाला राग येतो. तर मग विचार करा की, माझी आणि संसदीय कार्यमंत्र्यांची काय अवस्था होत असेल. तुमच्या अनुपस्थितीमुळे आम्हाला किती वाईट वाटत असेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व गोष्टी खासदारांसमोर ठेवत त्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणि कामकाजात सहभागी होण्यास सांगितले आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना इशारा देत स्वत:मध्ये वेळीच बदल घडवून आणा अन्यथा परिवर्तन घडेल असंही म्हटलं आहे.
वाचा : राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
14 नोव्हेंबरला पंतप्रधान करणार चर्चा
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व खासदारांना संसदेत सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांच्या जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्षांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा प्रस्ताव मान्य करत 14 नोव्हेंबरला आपल्या भागातील जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांसोबत चहावर चर्चा करणार असल्याचे सांगितले.
खासदार क्रीडा स्पर्धेबाबत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना वर्षभर क्रीडा स्पर्धा आयोजित कऱण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच स्पर्धेत विविध खेळांचा समावेश करावा असेही सांगितले आहे.
सरपंचांचे नरेंद्र मोदींना साकडे, रिटर्न गिफ्ट देण्याची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी गोव्यातील सरपंचांनी त्यांना एक पत्र लिहिलं आहे. पाच वर्षांपासून बंद असलेल्या लोहखनिज खाणींमध्ये खाणकाम सुरू करून आपला उदरनिर्वाह वाचवावा, असे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोवा मुक्ति दिवसाचे 60 वा वर्धापन दिवस निमित्त कार्यक्रमाला येत आहेत. गोव्यातील खाण क्षेत्रातील 20 हून अधिक सरपंचांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटले आहे की, गोव्यातील पाच लाखांहून अधिक लोक पूर्णपणे खनन कामावरुन रोजी रोटी कमवत होते. परंतु 2018 पासून खाणकाम पूर्णपणे बंद आहे. यामुळे संविधानामध्ये नागरिकांना दिलेला आजीविकेचा अधिकार धोक्यात आहे.
सरपंच सूरया नाइक म्हणतात की, गोव्याने नरेंद्र मोदींना 2013 मध्ये पंतप्रधान म्हणून नामांकित केले होते, आता मोदीजींनी खाणकाम सुरू करावे आणि रिटर्न गिफ्ट द्यावे. गोव्यात निवडणुकीपूर्वी खाणकाम सुरू व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narendra modi