Home /News /national /

सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, पॅसेंजर ट्रेनच्या बोगीला लावली आग

सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, पॅसेंजर ट्रेनच्या बोगीला लावली आग

बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही विद्यार्थी आक्रमक, गयामध्ये पॅसेंजर ट्रेनला लावली आग

बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही विद्यार्थी आक्रमक, गयामध्ये पॅसेंजर ट्रेनला लावली आग

गेल्या दोन दिवसांपासून आरआऱबी एनटीपीसीच्या(NTPC) निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रेल्वे विभागातील आरआरबी (RRB)एनटीपीसी(NTPC) परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. बिहारच्या बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरानंतर आता गया रेल्वे स्टेशनवरही आक्रमक भूमिका घेत पॅसेंजर ट्रेनच्या बोगीला आग लावली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 26 जानेवारी: गेल्या दोन दिवसांपासून आरआऱबी एनटीपीसीच्या(NTPC) निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रेल्वे विभागातील आरआरबी (RRB)एनटीपीसी(NTPC) परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. बिहारच्या बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरानंतर आता गया रेल्वे स्टेशनवरही आक्रमक भूमिका घेत पॅसेंजर ट्रेनच्या बोगीला आग लावली आहे. आज गयामध्येही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. गया रेल्वे स्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी चालत्या ट्रेनवर दगडफेक केली. दुसरीकडे, संतप्त विद्यार्थ्यांनी यार्डात उभी असलेली पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. जळत्या ट्रेनच्या बोगीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे, मात्र आंदोलक विद्यार्थ्यांसमोर पोलिसांचा आंदोलक विद्यार्थ्यांवरचा ताबा सुटताना दिसत आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी अनेक गाड्यांना लक्ष्य केले आहे. श्रमजीवी एक्स्प्रेसचेही विद्यार्थ्यांनी मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, संतप्त विद्यार्थ्यांनी भाबुआ-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसच्या बोगीला आग लावली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, मात्र विद्यार्थी वेळोवेळी गोंधळ घालत आहेत आणि पोलिसांवर दगडफेकही करत आहेत. गया एसएसपी आदित्य कुमार यांच्यासह आरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही घटनास्थळी उपस्थित आहेत. जेहानाबादमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी पाटणा-गया पॅसेंजर ट्रेन जेहानाबाद स्टेशनवर थांबवून निषेध केला. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले. परिक्षा स्थगित 14 जानेवारी रोजी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रेल्वे, आरआरबी आणि एनटीपीसीच्या निकालात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील CB-2 काढून टाकण्याची मागणी केली. आरआरबी एनटीपीसी(NTPC) निकालाबाबत बिहारमधील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने NTPC आणि लेव्हल 1 च्या परीक्षेवर बंदी घातली आहे. तसेच एक पत्रका जारी करत रेल्वे रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना नोकरी देण्यात येणार नाही. असे स्पष्ट केले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Indian railway, Railway, Railway jobs, Railway tracks

    पुढील बातम्या