बांदा (उत्तरप्रदेश), 16 एप्रिल : एका प्रेमिकेने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच घरुन सोने आणि दागिन्यांची चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना बुंदेलखंडच्या (Bundelkhand) बांदामध्ये घडली. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेले दागिनेही जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी बांदाच्या बदौसा पोलीस ठाण्यात (Banda Badausa Police Station) विष्णु नावाच्या एका व्यक्तीने आपल्या घरुन सोने चांदीचे दागिने चोरी झाल्याची तक्रार केली होती. यानंतर तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्न करण्याऐवजी पोहोचले तुरुंगात - याप्रकरणी पोलीस तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रेयसीने तिच्या घरातीलच दागिने आपल्या प्रियकरासोबत मिळून चोरले. यादरम्यान, तक्रारदार विष्णु याचवेळी आपल्या परिवारासोबत एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्याचवेळी घरात त्यांची मुलगी होती. याचदरम्यान, त्यांच्या मुलीने आपल्या घरात जमिनीच्या आत गाडलेले सर्व सोने-चांदीचे दागिने काढले आणि आपल्या प्रियकराला दिले. तसेच आपण हे दागिने घेऊन पळून जाऊन प्रेमविवाह करू, असे त्याला सांगितले. हेही वाचा - पतीने चुकून पत्नीच्या विक्रीची दिली ऑनलाईन जाहिरात; खरेदीदारांनी केली हद्द पार, पाहून खुश झाली महिला लग्न समारंभाहून घरी परत आल्यावर त्या मुलीचे वडील विष्णू यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे समजले. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या तरुणीने प्रियकरासह तिच्या कुटुंबीयांना चोरीच्या नाटकात अडकवण्याचा प्रयत्न केला असला, तरी पोलिसांच्या दबावाखाली दोघेही वेगळे झाले. त्याचवेळी पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला अटक करून तुरुंगात टाकले आहे. पोलिसांचे काय म्हणणे? याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीनारायण मिश्र यांनी सांगितले की, ही घटना 1 एप्रिलला समोर आली होती. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली होती. तपासादरम्यान, या दोन्ही प्रियकर आणि प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. मुलाचे नाव निशा श्रीवास आहे तर मुलाचे नाव विनीत गुप्ता असे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.