टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

मोबाइल फोन ही आता गरज नसून सवय झाली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल हातात असतो.

  • Share this:

मोबाइल फोन ही आता गरज नसून सवय झाली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल हातात असतो. एवढंच काय तर टॉयलेट सीटवर बसूनही अनेकजण मोबाइल वापर करतात. 2015 मध्ये Verizon Wireless च्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, 10 पैकी नऊ लोक बाथरूममध्ये मोबाइल घेऊन जातात. स्वतःला अपडेट ठेवणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण यामुळे अनेकदी पाइल्ससारखे (piles/hemorrhoids ) गंभीर आजार होऊ शकतात.

जे लोक टॉयलेट सीटवर बसून मोबाइलचा वापर करतात त्यांच्या पार्श्वभागावर गरजेपेक्षा जास्त ताण पडतो आणि सगळ्या समस्या इथूनच सुरू होतात. तज्ज्ञांच्यामते, कमोडवर बसून मोबाइल वापरणारे युझर खूपवेळ मोबाइलमध्येच दंग होऊन जातात आणि त्यांना वेळेचं भान राहत नाही. काही काळाने या सवयीमुळे त्यांना पाइल्ससारखा आजार होऊ शकतो.

एका संशोधनानुसार डॉक्टरांनी टॉयलेट सीवर बसून मोबाइलचा वापर करणाऱ्या युझरना काही प्रश्न विचारले. अनेकांनी सांगितले की, कमोडवर बसून जे मोबाइलवर असतात त्यांना इतरांच्या तुलनेत आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यातही लोकांना पाइल्स हा आजार मोठ्या प्रमाणात होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आजच मोडा जेवणानंतर पाणी पिण्याची सवय, होतील गंभीर आजार

पितृपक्षाच्या महिन्यात चुकूनही ही 7 कामं करू नका!

जाणून घ्या, पत्नीला खूश ठेवण्याचे 10 उपाय

फ्रॅक्चर झालंय? या प्रोटीनपासून रहा सावधान, होऊ शकतं नुकसान!

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

Published by: Madhura Nerurkar
First published: September 25, 2019, 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading