मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रियकराचं ढाल बनून केलं संरक्षण, नवऱ्यालाही जुमानलं नाही; पोलीस ठाण्यातच रंगला फॅमिली ड्रामा

प्रियकराचं ढाल बनून केलं संरक्षण, नवऱ्यालाही जुमानलं नाही; पोलीस ठाण्यातच रंगला फॅमिली ड्रामा

 छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) कांकेरमध्ये (Kanker) एक नववधू कुटुंब आणि समाजासमोर आपल्या प्रियकरासाठी ढाल बनून उभी राहिली. या तरुणीचा आविर्भाव पाहून सर्वजण तिच्यासमोर स्तब्ध झाले.

छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) कांकेरमध्ये (Kanker) एक नववधू कुटुंब आणि समाजासमोर आपल्या प्रियकरासाठी ढाल बनून उभी राहिली. या तरुणीचा आविर्भाव पाहून सर्वजण तिच्यासमोर स्तब्ध झाले.

छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) कांकेरमध्ये (Kanker) एक नववधू कुटुंब आणि समाजासमोर आपल्या प्रियकरासाठी ढाल बनून उभी राहिली. या तरुणीचा आविर्भाव पाहून सर्वजण तिच्यासमोर स्तब्ध झाले.

कांकेर, 11 फेब्रुवारी: छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) कांकेरमध्ये (Kanker) एक नववधू कुटुंब आणि समाजासमोर आपल्या प्रियकरासाठी ढाल बनून उभी राहिली. या तरुणीचा आविर्भाव पाहून सर्वजण तिच्यासमोर स्तब्ध झाले. या फॅमिली ड्रामामध्ये (Family Drama in Police Station) या तरुणीच्या नवऱ्यालाही तिच्या सर्व गोष्टींचा स्वीकार करावा लागला. हा ड्रामा बराच वेळ सुरू राहिला आणि त्यानंतर प्रियकर आणि प्रेयसी एकत्र आले. नवऱ्याचे नातेवाईक या प्रियकराला मारहाण करण्याच्या तयारीत असता, ही तरुणी प्रियकरासमोर ढाल बनून उभी राहिली आणि तिनं त्याचं संरक्षण केलं. याप्रकरणी कांकेर पोलीस स्टेशनमध्ये तरुणीच्या प्रियकरावर यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर त्याला सोडून देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती सहारे (Aarti Sahare) ही दंतेवाडा येथील रहिवासी आहे. तिचे दीर्घकाळापासून बस्तरमधल्या बकावंड येथे राहणाऱ्या विकास गुप्तासोबत (Vikas Gupta) प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव टाकून महाराष्ट्रातील एका तरुणासोबत तिचा विवाह निश्चित केला. 6 फेब्रुवारीला त्यांचा विवाह झाला. आरती आपल्या पतीसह सासरी जात असताना, राजनांदगावमधल्या मानपूर येथे येताच तिने टॉयलेटला जाण्याचा बहाणा केला आणि गाडीतून खाली उतरली. तिथून ती प्रियकर विकाससोबत पळून गेली आणि या कहाणीत ट्विस्ट आला. ही बाब समजताच सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कुटुंबीयांना या प्रकाराबाबत पोलिसांना कळवले आणि 7 फेब्रुवारीला कांकेर पोलिसांनी त्याला पकडलं.

हे वाता-VIDEO: महिलेनं पोटच्या लेकराला लटकावलं दहाव्या मजल्यावर; कारण वाचून बसेल धक्का

पोलिसांसमोर सुरू झाला फॅमिली ड्रामा

8 फेब्रुवारीला या प्रकरणी अगदी रस्त्यावरून हा फॅमिली ड्रामा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांनी तरूणीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, याच दिवशी आरतीच्या पतीने नातेवाईकांसह कांकेर पोलीस स्टेशन गाठलं. या तरुणीची आई आधीच नातेवाईकांसह पोलीस स्टेशनमध्ये हजर होती. दुसरीकडे तरुणीच्या प्रियकराचा भाऊही तिथे पोहोचला. पोलिसांसमक्ष ड्रामा सुरू झाला. पोलिसांनी विकासला समजवून बाहेर थांबायला सांगितलं. यावेळी पोलिसांनी तरुणीकडे विचारणा केली असता, आरतीने मी फक्त माझ्या प्रियकरासोबत (Boyfriend) जाणार असल्याचं स्पष्ट केलं. तिच्या आईनेही पोलिसांसमोर याला होकार दिला.

हे वाचा-गुरूंच्या भेटीला जाताना भीषण अपघात, नांदेडच्या महंत त्यागीनंद महाजांचा मृत्यू

अशा पद्धतीनं केलं प्रियकराचं रक्षण

असं म्हणत, ही तरुणी तिच्या प्रियकराला शोधण्यासाठी बाहेर पडली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या पतीच्या नातेवाईकांनी विकासला घेराव घातला असून ते त्याला मारहाण करू शकतात, हे तरुणीच्या लक्षात आलं. काही अघटित घडण्यापूर्वीच ती तिच्या प्रियकराच्या समोर जाऊन ढालीसारखी उभी राहिली. 'विकासला काही बरंवाईट झालं तर मी कोणालाही सोडणार नाही', असे तिनं सर्वांना बजावलं. तिचा हा आर्विभाव पाहून सर्वजण स्तब्ध झाले. त्यानंतर मात्र नातेवाईक आणि पोलीस यांनी या मुलीसमोर हात टेकले आणि तिच्या प्रेमसंबंधांना मान्यता देणं त्यांना भागच पडलं.

First published:

Tags: Chattisgarh