मराठी बातम्या /बातम्या /देश /

...अन् नवरी पळाली! नवऱ्यासह पाठवणी झाल्यानंतर टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत केलं पलायन

...अन् नवरी पळाली! नवऱ्यासह पाठवणी झाल्यानंतर टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत केलं पलायन

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता आरतीने सांगितलं की, बस्तरमध्ये राहणाऱ्या विकास गुप्ता याच्यासोबत तिचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध (Affiair) होते. मात्र त्यांचे कुटुंबीय दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता आरतीने सांगितलं की, बस्तरमध्ये राहणाऱ्या विकास गुप्ता याच्यासोबत तिचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध (Affiair) होते. मात्र त्यांचे कुटुंबीय दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता आरतीने सांगितलं की, बस्तरमध्ये राहणाऱ्या विकास गुप्ता याच्यासोबत तिचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध (Affiair) होते. मात्र त्यांचे कुटुंबीय दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते.

रायपूर, 09 फेब्रुवारी: दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम असूनही घरच्यांच्या दबावामुळे तिसऱ्याच व्यक्तीबरोबर लग्न करणारे अनेकजण असतात. काहीजण भूतकाळ मागे टाकून नवीन आयुष्याला सुरुवात करतात; तर काही मात्र लग्नानंतरही आपल्या आधीच्या प्रेमाला विसरू शकत नाहीत आणि प्रियकर किंवा प्रेयसीबरोबर पळून जाण्याचा मार्ग स्वीकारतात. अशीच एक धक्कादायक घटना छत्तीसगडमधील (Chattisgarh) बस्तरमध्ये घडली आहे. इथं लग्नानंतर सासरी निघालेल्या नववधूने (Bride) टॉयलेटला (Toilet) जाण्याचा बहाणा करत प्रियकरासोबत पळ काढला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा (Dantewada) इथली रहिवासी असलेल्या आरती सहारे हिचा विवाह 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील (Maharashtra) सावरगाव इथं राहणाऱ्या तरुणाशी झाला. बालोद जिल्ह्यातील डल्लीराजहरा या मुलीच्या वडिलांच्या मूळ गावी लग्नाचे विधी पार पडले. लग्नानंतर 7 फेब्रुवारी रोजी पहाटे तिची पाठवणी करण्यात आली. कारमधून प्रवास करत असताना राजनंदगावातील मानपूरजवळ पोहोचल्यावर वधूने टॉयलेटला जाण्याचं निमित्त केलं आणि ती गाडीतून खाली उतरली. त्यानंतर बराच वेळ ती परत आली नाही. तेव्हा एकच खळबळ उडाली. पती आणि सोबत असलेल्या इतर वऱ्हाडी मंडळीनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काहीच शोध न लागल्यानं मानपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

हे वाचा-नेता- अभिनेता नाही; 'हा' आहे वाहन चोर...तरी रस्त्यावर लागले होर्डिंग्स

मानपूर पोलिसांनी ताबडतोब या नववधूचा शोध घेण्यास सुरुवात केली. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. तसंच आसपासच्या जिल्ह्यांतील पोलिसांनाही याबाबत सूचना दिली. कांकेर पोलिसांनीही वाहनांची तपासणी सुरू केली. अखेर मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास कांकेर पोलिसांनी आरतीला विकास गुप्ता नावाच्या तरुणासोबत पकडले. दोघांनाही नंतर मानपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता आरतीने सांगितलं की, बस्तरमध्ये राहणाऱ्या विकास गुप्ता याच्यासोबत तिचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध (Affiair) होते. मात्र त्यांचे कुटुंबीय दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. आरतीचे तिच्या घरच्यांनी लग्न ठरवले आणि लग्न होईपर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी केली. तिच्यावर घरच्यांचं बारीक लक्ष होतं, त्यामुळे ती आणि विकास तिच्या लग्नाआधी पळून जाऊ शकले नाहीत. तेव्हा आरतीनं लग्नानंतर सासरी जाताना पळून जाण्याची योजना आखली. त्यानुसार, पाठवणी झाल्यावर तिनं आपला प्रियकर विकास याला व्हॉट्सअ‍ॅपवर लाइव्ह लोकेशन (Whatsapp Live Location) पाठवण्यास सुरुवात केली. कारमधून प्रवास सुरू झाल्यावरही ती त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर लाइव्ह लोकेशन पाठवत राहिली. थोड्या वेळाने योग्य संधी पाहून ती टॉयलेटच्या बहाण्याने गाडीतून उतरली आणि पळून गेली. विकासने तिला पळवले नाही, तर तिनंच त्याला बोलावून घेतल्याचं तिनं स्पष्ट केलं. तसंच लग्नात सात फेरे घेतले नसल्याचं आणि नंतर मंगळसूत्रही काढून टाकल्याचं आरतीनं पोलिसांना सांगितलं.

हे वाचा-2 दिवसांपासून दरीत अडकलेल्या 'बाबू'ची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन थरारक Video

प्रवासादरम्यान टॉयलेटला गेलेली नववधू हरवली नव्हती किंवा तिचं अपहरण झालं नव्हतं तर ती स्वतःच आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची ही धक्कादायक कहाणी मानपूर पोलिसांनी एका दिवसात उघडकीस आणली. नववधूच्या या पलायनाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

First published:

Tags: Chattisgarh