मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mahant Tyaginand Maharaj: गुरूंच्या भेटीला जाताना भीषण अपघात, नांदेडच्या महंत त्यागीनंद महाजांचा बिहारमध्ये अपघाती मृत्यू

Mahant Tyaginand Maharaj: गुरूंच्या भेटीला जाताना भीषण अपघात, नांदेडच्या महंत त्यागीनंद महाजांचा बिहारमध्ये अपघाती मृत्यू

गुरूंच्या भेटीला जाताना भीषण अपघात, नांदेडच्या महंत त्यागीनंद महाजांचा बिहारमध्ये अपघाती मृत्यू

गुरूंच्या भेटीला जाताना भीषण अपघात, नांदेडच्या महंत त्यागीनंद महाजांचा बिहारमध्ये अपघाती मृत्यू

नांदेडच्या महंत त्यागीनंद महाराज यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महंत त्यागीनंद महाराज यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

नांदेड, 11 फेब्रुवारी : नांदेड, उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी निघालेल्या नांदेड तालुक्यातील पुणेगाव (Punegaon Nanded) येथील त्यागी महाराज (Mahant Tyaginand Maharaj) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बिहारमध्ये झालेल्या या अपघातात महंत त्यागीनंद महाराज यांच्यासह अन्य एकाचा या कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. या अपघातात कारमधील इतर पाच जण जखमी झाले आहेत. (Nanded Mahant Tyaginand Maharaj car accident in Bihar)

पुणेगावकडे जाताना भीषण अपघात

पुणेगाव येथील मठाचे योगी त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरात भक्त आहेत. दरवर्षी ते पुणेगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यानिमित्त उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी ते दोन दिवसांपूर्वी पुणेगाव येथून कारने निघाले होते. चालकासह या कारमध्ये सात जण होते.

कार चालकाला डोळा लागला आणि...

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार बिहार राज्यातील चाळीसगाव परिसरात आली असताना चालकाचा डोळा लागल्याने कारची ट्रकला पाठीमागून धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की कारमधील योगी त्यागी महाराज आणि बळीराम विक्रम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला.

वाचा : खात्यावर आले 15 लाख; मोदींचे आभार मानले अन् घर बांधले, आता धक्कादायक माहिती उघड

कारमधील इतर जखमी

घटना घडली त्यावेळी कारमध्ये त्यागी महाराज यांच्यासह इतरही काहीजण होते. आमदूरा आणि माळ कौठ येथील चार जण आणि चालक या अपघातात जखमी झाले आहेत. त्यागी महाराज यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पुणेगाव वर शोककळा पसरली आहे.

हा अपघात बिहारमध्ये झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 30 येथे पहाटेच्या सुमारास झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग जास्त होता. भरधाव वेगात असलेल्या कारने समोरील बांबूने भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

वाचा : ठाकरे-पवारांचं मिशन मुंबई, आदित्य-अजितदादांचा एकाच गाडीतून प्रवास अन् पाहणी दौरा

कटनी-जबलपूर सीमेवर धनगव्हाणजवळ महंत त्यागीनंद महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. एमएच 26 एके 7133 या कारने महंत त्यागीनंद महाराज प्रवास करत होते. या अपघातात महंत त्यागीनंद महाराज यांच्यासह अन्य एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

स्थानिक सिहोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी गिरीश धुर्वे यांनी सांगितले की, महंत त्यागीनंद महाराजांची गाडी भरधाव वेगात असावी आणि ट्रकला ओव्हरटेक करताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. यासोबतच ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी धुके सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि धुके हे सुद्धा अपघाताचे एक कारण मानले जात आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Bihar, Nanded