लखनऊ 17 जून : नववधू तयार होण्यासाठी लग्नाच्या दिवशी ब्युटी पार्लरमध्ये गेली. पण इथून ती मंडपात परतलीच नाही. तरुणी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. ही बातमी समजताच वराने पोलीस स्टेशन गाठलं आणि वधूला परत आणण्याची विनंती पोलिसांना केली. या घटनेनंतर वधू पक्ष आपल्या मुलीच्या शोधात गुंतला आहे, दुसरीकडे नवरदेवाची बाजू वरातीच्या तयारीसाठी खर्च केलेले पैसे परत करण्याची मागणी करत आहे. तर पोलिसांचं पथक वधूचा शोध घेत असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या काही वेळ आधी ब्युटी पार्लरमधून वधू फरार झाल्याचे प्रकरण हमीरपूरच्या सदर कोतवाली भागातील आहे. जुन्या बेटवा घाटातून वरात नवरीच्या घरी येणार होती. एकीकडे लग्नाची वरात काढण्यासाठी वराच्या बाजूने पूर्ण तयारी झाली होती, तर दुसरीकडे वधू पक्षाने वरातीच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती आणि मुलीला ब्युटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी पाठवलं होतं. काकूही मुलीसोबत ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. पण ब्युटी पार्लरमधून काकू एकट्याच घरी आल्यावर लग्नघरात गोंधळ उडाला. लग्नाला झालेले 7 दिवस; पण नवरीच्या डोक्यात भलताच प्लॅन, प्रियकरासाठी सगळ्या ‘मर्यादा’ ओलांडल्या काकूने मुलीच्या वडिलांसह कुटुंबातील सदस्यांना सांगितलं, की परिसरातील एका तरुणाने त्यांच्या मुलीला ब्युटी पार्लरमधून नेलं आहे. याची माहिती लगेच वराकडील लोकांनी दिली. या घटनेबद्दल ऐकताच वराच्या घरातही डीजेचा दणदणाट बंद झाला असून निराशा पसरली आहे. नवरदेव मोहितने सांगितलं की, त्याने कपडे घालून लग्नाची वरात काढण्याची तयारी केली होती. मात्र, ब्युटी पार्लरमधून तरुणी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची अचानक माहिती मिळाली. दुसरीकडे वराच्या आईने सांगितलं की, पतीच्या निधनानंतर तिने कशीतरी पैशाची व्यवस्था करून मुलाच्या लग्नाची तयारी केली होती. कष्टाचे पैसे वाया गेले. आता त्यांना हे पैसे कोण देणार? मोहितच्या आईने सांगितलं की, लग्नाच्या वरातीसाठी घरातून निघताना तिला माहिती मिळाली की, ज्या मुलीला ती सून म्हणून घरी आणणार होती, ती आधीच ब्युटी पार्लरमधून पळून गेली. रात्रभर वधूचे कुटुंबीय आणि वराच्या बाजूचे लोक वधूचा शोध घेत राहिले, मात्र तिचा कोणताही पत्ता लागला नाही. हमीरपूर पोलिस स्टेशन कोतवालीचे प्रभारी निरीक्षक दुर्ग विजय सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात आले होते. रात्रभर पोलिसांनी वधूचा शोध घेतला. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार प्राप्त होताच एफआयआर नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.