लखनऊ 17 जून : एक नवविवाहित तरुणी लग्नानंतर प्रियकरासह पळून गेली. असं सांगितलं जात आहे की, 31 मे रोजी मुलीचं लग्न झालं होतं, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरी आली होती. पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता. ती घरच्यांना असं सांगून बाहेर पडली की मला काही सामान घ्यायचं आहे. त्यानंतर ती तिथून प्रियकरासह पळून गेली. ही घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथे घडली यासोबतच तिने घरातून दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. मुलगी घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी मुलीला फोन केला पण स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर नातेवाईकांसह वडिलांनी तिचा शोध सुरू केला. परंतु नवविवाहित तरुणीबद्दल काहीही कळू शकलं नाही. नंतर कळालं की मुलगी तिच्याच भावाच्या सासरकडील एका नातेवाईकासोबत पळून गेली होती. व्यथित झालेल्या वडिलांनी दोन तरुणांची नावे घेऊन एफआयआर दाखल केला आहे. आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. 6 जून रोजी ती तिच्या माहेरी आली होती. Viral News: आपल्या लग्नात आलेल्या मित्राच्याच प्रेमात पडली तरुणी; पुढं जे घडलं ते थक्क करणारं हे प्रकरण नरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी 31 मे 2023 रोजी कालिंजर पोलीस स्टेशन परिसरात आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. 6 जून रोजी मुलगी माहेरी परतली. त्यानंतर 11 जून रोजी ती वस्तू घेण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि परत आलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे वडिलांना समजले. यासोबतच घरातून रोख रक्कम आणि दागिनेही नेले होते. मुलीचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून मुलीच्या भावाचा सासरचा नातेवाईक आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस नवविवाहित महिलेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी माहिती देताना एसएचओ अरविंद सिंह गौर यांनी सांगितलं की, मुलीच्या बेपत्ता प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सध्या तिचा शोध सुरू आहे. लवकरच मुलीला परत आणून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.