Home /News /national /

मोठी बातमी! मुंबईनंतर केरळमध्ये सापडली स्फोटकं, ट्रेनमधून 100 हून जास्त जिलेटिन कांड्या आणि 350 डिटोनेटर जप्त

मोठी बातमी! मुंबईनंतर केरळमध्ये सापडली स्फोटकं, ट्रेनमधून 100 हून जास्त जिलेटिन कांड्या आणि 350 डिटोनेटर जप्त

मुंबई पाठोपाठ आता केरळमधून धक्कादायक बातमी समोर येते आहे. केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकातील (Kozhikode Railway Station)चेन्नई मंगलपुरम एक्सप्रेस -02685 मध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडला आहे.

    कोझिकोड, 26 फेब्रुवारी: मुंबई पाठोपाठ आता केरळमधून धक्कादायक बातमी समोर येते आहे. केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकातील (Kozhikode Railway Station) चेन्नई मंगलपुरम एक्सप्रेस -02685 मध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने ट्रेनमधून 100 हून अधिक जिलेटिन कांड्या (Gelatin Sticks) आणि 350 डिटोनेटर जप्त केले आहेत. याप्रकरणी एका महिलेला अटकही करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये स्फोटकं सापडल्यानंतर एका संशयित महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. ही महिला तमिळनाडूमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. ट्रेनमध्ये ही महिला ज्याठिकाणी बसली होती, त्याठिकाणच्या सीटखालून हा साठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने असे मान्य केले आहे की विहिर खोदण्याच्या कामासाठी तिने जिलेटिनच्या कांड्या आणल्या होत्या. मुंबईत आढळली बेवारस गाडी मुंबईच्या पेडर रोड (Peddar Road) परिसरात एका रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्यानं (Gelatin explosives in Mumbai ) खळबळ उडाली होती. ही बेवारस गाडी या परिसरात तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे बंगले, राजकीय व्यक्तींची ये-ज, दूतावास कार्यालयं  आहेत आणि तिथेच स्फोटकांची गाडी सापडल्याने अधिकच चिंतेचा विषय आहे. जिलेटिन म्हणजे काय? जिलेटिन हा एक प्रकारचा स्फोटक आहे जो द्रव किंवा घन स्वरूपात वापरला जातो. हा एक गन-कॉटन स्वरुपातील स्फोटक आहे. भारतात हे स्फोटक पर्वत तोडण्यासाठी आणि खाणींमध्ये वापरतात. ते खरेदी करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी परवाना आवश्यक आहे. शासन त्याचे प्रमाण आणि उपयोग ठरवते. ट्रिगर मिळाल्यावर जिलेटिनचा स्फोट होतो. नक्षलवादी संघटनेशिवाय दहशतवादी संघटनांकडूनही याचा वापर केला जातो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gelatin explosives, India, Kerala, Kozhikode, Mumbai

    पुढील बातम्या