नवी दिल्ली, 08 जुलै : पाकिस्तानातील बालाकोट येथे Air Strike केल्यानंतर भारतानं आता क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. 290 किलो मीटर मारक क्षमता असलेलं ब्रह्मोस आता 500 किलो मीटरपर्यंत शत्रुचे ठाणे उद्धवस्त करू शकणार आहे. यापूर्वी भारतानं 40 सुखोई विमानं ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सज्ज करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू केली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे सीईओ सुधीर कुमार मिश्र यांनी याबाबतची माहिती दिली. ब्रह्मोसची मारक क्षमता वाढवल्यानं आता भारताच्या संरक्षण ताकदीमध्ये वाढ झाली आहे. सुखोई – 30 या विमानांवरून ब्रह्मोस आता लक्ष्यभेद करू शकणार आहे, अशी कामगिरी करणारा भारत देशातील पहिलाच देश आहे. ब्रह्मोस 90 डिग्रीतील लक्ष्याचं वेध घेणारं एक महत्त्वाचं क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियानं संयुक्तपणे ब्रह्मोसची निर्मिती केली आहे. Congress – JDS सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न; 13 आमदारांना मोठी ऑफर भारत, अमेरिकेचा उपक्रम भारत आणि अमेरिका देखील आता संयुक्तपणे सुरक्षेसंदर्भात कार्यक्रमांवर एकत्रितरित्या काम करत आहेत. आगामी काळात संरक्षण दृष्ट्या देशाला बळकट करण्यावर भारतानं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे अनेक उपक्रम भारतानं हाती घेतल्याचं पाहायाला मिळत आहे. भारतानं अमेरिका आणि रशियाशी देखील काही करार केले आहेत. तसंच 2020मध्ये भारताला पहिलं राफेल विमान मिळणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफेल विमानांची खरेदी करणार आहे. तिवरे धरणाविरोधात तक्रार दिलेल्या अजित चव्हाणांनी गमावले कुटुंबातील 5 जण!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.