Congress – JDS सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न; 13 आमदारांना मोठी ऑफर

कर्नाटकातील Congress – JDS सरकार वाचवण्यासाठी आता 13 आमदारांची मनधरणी केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 09:26 AM IST

Congress – JDS सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न; 13 आमदारांना मोठी ऑफर

बंगळुरू, 08 जुलै : कर्नाटकातील 13 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेस – जेडीएस सरकार वाचवण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या 13 आमदार मुंबईत असून त्यांची मनधरणी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. या 13 आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली असून त्यांच्या मतदारसंघाकरता विशेष पॅकेज देण्याची देखील तयारी दर्शवण्यात आली आहे. पण, आमदारांनी ऑफर्स नाकारल्याची माहिती आता समोर येत आहे. सत्ता स्थापन करून काँग्रेस – जेडीएस सरकारला केवळ 13 महिने झाले आहेत. आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कर्नाटकात राजकीय परिस्थिती बदलताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आता मुख्यमंत्री कुमारस्वामी आमदारांशी संवाद साधणार आहेत. राजीनामा दिलेल्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख नेते के. सी. वेणुगोपाळ, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि एम. बी. पाटील सतत बैठका घेत या आमदारांशी वार्तालाप करत आहेत. आमदारांनी दिलेली मंत्रिपदाची ऑफर देखील फेटाळून लावली आहे.

आमदार राजीनाम्यावर ठाम

दरम्यान, 1 आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम असून त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, एस. टी. सोमशेखर, ब्यार्ती बासवरजु, एन. मुनिरत्ना आणि रामलिंगा रेड्डी यांच्या मनधरणीसाठी सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत.

भाजपमध्ये करणार 13 आमदार प्रवेश?

राजीनामा दिलेले 13 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील आता माहिती समोर येत आहे. त्यामुऴे काँग्रेस – जेडीएस सरकार पाडून भाजप कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 2018मध्ये भाजपला सत्तेत येणं शक्य झालं नव्हतं.

Loading...

तिवरे धरणाविरोधात तक्रार दिलेल्या अजित चव्हाणांनी गमावले कुटुंबातील 5 जण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...