मराठी बातम्या /बातम्या /देश /आईवर प्रेम आणि मुलीसोबत करायचा चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकीनं दिला भयंकर मृत्यू

आईवर प्रेम आणि मुलीसोबत करायचा चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकीनं दिला भयंकर मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder News: काही दिवसांपूर्वी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. कोणीतरी चाकूने वार करून विटांनी डोकं ठेचलं होतं. पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे.

नोएडा, 26 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी एका तरुणाची निर्घृण हत्या (brutal murder) केल्याची घटना घडली होती. कोणीतरी चाकूने वार करून विटांनी डोकं ठेचलं होतं. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला. घटनेच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं असून पोलिसांनी मायलेकींना अटक (Mother and daughter arrested) केली आहे. संबंधित मायलेकीनीच ही हत्या केल्याचं पोलीस तपास समोर आलं आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली शस्त्र आणि काही पुरावे आरोपींकडून ताब्यात घेतली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना नोएडा शहरातील एक्सटेंशन येथे 19 नोव्हेंबरच्या रात्री उघडकीस आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं आरोपी महिलेशी प्रेमसंबंध सुरू होते. पण मृत तरुणाचं आरोपी महिलेच्या मुलीवर देखील वाईट नजर होती. आरोपी तिची नेहमी छेड काढायचा. याची  माहिती मिळाल्यानंतर, आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराची अनेकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता.

हेही वाचा-Shocking ! PSI ची परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

त्यामुळे आरोपी महिलेनं आपल्या मुलीशी संगनमत करून प्रियकराच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार वेळ मिळताच मायलेकींनी प्रियकराची निर्घृण हत्या केली. आरोपी मायलेकींनी मृतकावर आधी चाकूने सपासप वार करून त्याचं डोकं विटांनी ठेचलं होतं. यानंतर आरोपींनी मृत तरुणाचा मृतदेह नोएडाच्या एक्सटेंशन परिसरातील विसरख परिसरात फेकून दिला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा-Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, या घटनेचे धागेदोरे आरोपी मायलेकीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मायलेकीला अटक केली असून त्यांच्याकडून मृत तरुणाचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक आणि मोबाइलसह हत्या करण्यासाठी वापरेला चाकू आणि विट देखील जप्त केली आहे. तसेच पोलिसांनी घटनेच्या दिवशी आरोपी मायलेकींनी परिधान केलेले कपडे देखील ताब्यात घेतले असून त्यावर रक्ताचे डाग आढळले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder