मराठी बातम्या /बातम्या /देश /

Shocking! PSI ची परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

Shocking! PSI ची परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Girl gangraped in moving car: पोलीस भरतीची परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस उप निरीक्षक पदाची परीक्षा (PSI exam) देऊन घरी परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार (gangrape) करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. (girl gangrape in moving car while returning from PSI exam)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही उत्तरप्रदेशातील आग्रा येथे पोलीस भरतीच्या परीक्षेला गेली होती. तेथे परीक्षा देऊन घरी परतत असताना आरोपींनी तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचं सोशल मीडियात आपल्या एका मित्रासोबत मैत्री झाली होती. तोच मित्र तिला पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी आग्रा येथे कारने घेऊन गेला होता. परीक्षेला जात असताना कारमध्ये पीडित मुलीचा तो सोशल मीडियातील मित्र आणि चालक इतकेच होते. पण घरी परतत असताना कारमध्ये इतर चौघेही आले.

वाचा : नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

पोलिसांनी सांगितले की, घरी परतत असताना पीडित मुलगी कारमध्ये बसली आणि त्यानंतर काही वेळातच गाडीतील आरोपींनी तिची छेड काढण्यास सुरुवात केली. ज्यावेळी पीडित तरुणीने या सर्वांना विरोध केला तेव्हा तिला आरोपींनी मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला रस्त्यावर सोडून पळ काढला. पीडित तरुणी जखमी अवस्थेत होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी तिला पाहिले असता तिला तिच्या घरी सोडले. यानंतर पीडित मुलीने आपल्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलीने आणि तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

वाचा : Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित मुलीने केवळ आरोपीचा फोन नंबर सांगितला आहे. या आरोपीची आणि पीडित मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. पीडित मुलीला त्या मुलाच्या बाबतीत इतर माहिती नाहीये.

बापच करायचा लैंगिक शोषण, मित्रांच्या मदतीने केला खून

आपलं लैंगिक शोषण करणाऱ्या बापाची मुलीने मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आपला बाप आपलं लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार या मुलीने तिच्या वर्गमित्रांना सांगितली होती. योग्य वेळ साधून बापाचा काटा काढण्याचा निर्णय या अल्पवयीन मित्रांनी घेतला आणि मुलीची आई बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत खून केला.

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या आणि एका शैक्षणिक संस्थेत सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या मुलीने मित्रांच्या मदतीनं खून केल्याचं उघड झालं आहे. कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी तिच्या मित्रांना वडिलांबाबत नेहमी सांगत असे. वडिलांकडून तिची आणि तिच्या बहिणीची होणारी लैंगिक छळवणूक असह्य होत असल्याचं तिनं मित्रांना सांगितलं होतं. घटनेच्या काळात मुलीची आई बाहेरगावी गेल्याचं निमित्त साधत सर्वांनी मिळून मुलीच्या वडिलांचा खून करण्याची योजना आखली.

First published:

Tags: Crime, Gang Rape, Uttar pardesh