Home /News /national /

मोबाईलप्रमाणं अपग्रेड होतात नोकऱ्या, 'या' गोष्टींची काळजी घेणं आहे गरजेचं

मोबाईलप्रमाणं अपग्रेड होतात नोकऱ्या, 'या' गोष्टींची काळजी घेणं आहे गरजेचं

­­नवी दिल्ली 9 फेब्रुवारी : कोरोनाच्या(Corona virus) या संकटकाळात अनेकांचा रोजगार(Employment) गेला. लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेक व्यवसाय बंद पडले तर काही ठिकाणी नवीन रोजगार निर्माण होण्यास अडचण झाली. परंतु, आता कोरोनाचं संकट कमी झालेलं आहे. त्यामुळं नवीन रोजगार निर्मिती होत आहे. याचबरोबर पुढील काळात आणखी रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. येत्या काळात रिअल इस्टेट सेक्टरमध्ये (Real Estate Sector)  तेजी येण्याची शक्यता आहे. यामुळं न्यूज 18 नेटवर्क 'नोकरी कि बात' ही सिरीज सुरु करत आहे. यामध्ये आज हिरानंदानी समूहाचे एमडी आणि नारेडको (Naredco) चेअरमन डॉ. निरंजन हीरानंदानी (Nirnjan Hiranandani) यांनी या क्षेत्रातील रोजगार आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या स्किलविषयी चर्चा केली आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गेलेल्या व्यक्तींनी काय करावे ? कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यानं चिंता करण्याची गरज नाही. आपल्याबरोबर वाईट झालं याचा विचार करत बसण्यापेक्षा आपलं स्किल आणि प्रतिभा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. या काळात स्वरोजगार मिळवण्यासाठी तुमचे स्किल आणि नॉलेज वाढवणं गरजेचं आहे. स्किल डेवलपमेंट (Skill Development) कसं वाढू शकतं ? यासाठी तुम्हाला  रिस्कलिंग अॅण्ड अपस्कलिंग (Re-skilling and Up-skilling)  फॉलो करण्याची गरज आहे. यामध्ये तुम्ही विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन वेबसाईटच्या मदतीनं तुमचे स्किल डेव्हलप करू शकता. तुमच्यासाठी कोणता पर्याय उत्तम आहे हे ओळखून तुम्ही यावर काम करू शकता. सध्या अनेक ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. यामधील कोर्सचा अभ्यास केल्यानंतर कंपन्या या आधारावर नोकऱ्या देतात का ? या नवीन कोर्समध्ये तुमचा फायदा नक्कीच पाहायला हवा. यामधून तुमचं स्किल वाढत आहे की नाही याचादेखील विचार करणं गरजेचं आहे. स्वरोजगारामध्ये या स्किलचा किती वापर होणार आहे, याचादेखील विचार करणं गरजेचं आहे. याचबरोबर या कोर्समधून किती प्रमाणात स्किल वाढणार आहे याकडंदेखील लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार मिळवण्यासाठी कोणते स्किल महत्त्वाचे आहेत याकडंदेखील लक्ष देऊन यानुसार हे कोर्स करायला हवेत. हळूहळू मार्केट सुरु होत आहे. युवकांनी कुठं आणि कसा रोजगार शोधावा ? कोरोनाच्या या संकट काळात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीनं तुम्ही नोकऱ्या शोधू शकता. याचबरोबर कोणत्याही संस्थेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकत असताना त्याठिकाणी कॅम्पसमधून नोकरी मिळणार आहे की नाही याचादेखील तपास करा. कोरोनानंतर भरती प्रक्रियेत बदल होणार आहेत? यामध्ये कामाच्या ठिकाणी काय गरजेचं आहे आणि कर्मचाऱ्याकडे काय स्किल आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. व्हाईट कॉलर जॉबमध्ये डिजिटल स्किल आणि अनेक ठिकाणी काम करण्याचा अनुभव गरजेचा आहे. तर ब्लु कॉलर जॉबमध्ये तुमच्याकडे प्रोफाइल बदलण्याबरोबरच मल्टी टास्किंग क्षमता असणंदेखील गरजेचं आहे. या कठीण काळात मुलाखतीची कशी तयारी करावी ? मुलाखतीमध्ये केवळ तुमचं ज्ञान आणि व्यक्तिमत्व दाखवायचं असतं. यामुळे कोरोनाच्या या संकटातनंतरदेखील यामध्ये विशेष बदल होणार नसल्याचं वाटतं. वर्तमान परिस्थितीत कोणत्या प्रकारचे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे ? कोणत्याही व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नोकऱ्या गरजेच्या आहेत. यामुळं कंपनीच्या वर्क कल्चरमध्ये फिट होणं गरजेचं आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना अपग्रेड होणं गरजेचं आहे. यामध्ये सरळ सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं झालं, तर ज्या पद्धतीनं मोबाईलने अनेक गोष्टींची जागा घेतली. त्याचपद्धतीने कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या स्किलमध्ये बदल करणे गरजेचं आहे.ज्या पद्धतीने सध्या २जी नंतर आता ४जी आणि ५ जीचा जमाना आला आहे त्याचपद्धतीने कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपग्रेड होण्याची गरज आहे. रिअल इस्टेटमध्ये रोजगाराची किती संधी उपलब्ध आहे ? रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या कामगारांची गरज असते. यामध्ये कुशल, अकुशल आणि अर्ध कुशल कामगारांची गरज असते. याचबरोबर मिस्त्री, इलेक्ट्रिशियन आणि अनेक प्रकारच्या कामांसाठी मनुष्यबळ लागते. या क्षेत्रात महत्त्वाच्या कामांसाठी आर्किटेक्ट, इंजीनियर, अकाउंटेंट आणि कायदेशीरसल्लागाराची देखील गरज असते. यामुळं भविष्यात या बरोबरच मार्केटिंग आणि सेल्स सारख्या नोकऱ्यादेखील निर्माण होणार आहेत. या क्षेत्रासाठी कोणतं स्किल  आणि प्रतिभा गरजेची आहे ? या क्षेत्रात प्रत्येक पदासाठी वेगवेगळं स्किल महत्त्वाचं आहे. यामध्ये कार्पेंटरसाठी त्याचं स्किल गरजेचं आहे. याचबरोबर आर्किटेक्टसाठी शैक्षणिक डिग्रीदेखील महत्त्वाची आहे. त्यामुळं भविष्यात स्किलबरोबर शैक्षणिक डिग्रीदेखील महत्त्वाची आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहाण्यासाठी युवकांनी काय करणं गरजेचं आहे? स्वतःमध्ये सतत बदल करत राहून रिस्किलिंग आणि अपस्किलिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या कंपनीच्या भरती प्रक्रियेविषयी माहित द्या आणि नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या कंपनीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो. कॉर्पोरेट कंपनीप्रमाणेच आमची भरती प्रक्रिया होते. यामध्ये तुमच्याकडील स्किल आणि प्रतिभा पाहून आम्ही उमेदवाराला संधी देतो. अतिशय पारदर्शक आणि वैज्ञानिक पद्धतीनं आमची निवड प्रक्रिया आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या कामाची अपेक्षा करत आहात ? याचबरोबर याचं मूल्यांकन कशा पद्धतीनं करता यासर्व गोष्टी जॉब प्रोफाईलवर अवलंबून आहेत. आम्ही केवळ शैक्षणिक योग्यता बघत नसून स्किल आणि विविध अँगलने उमेदवाराची तपासणी करतो. यामुळं आमच्या कंपनीमध्ये सर्वोत्तम व्यक्ती काम करतात. तुमची कंपनी आणि या क्षेत्रात विकासास चालना आहे का ? घर ही जीवनावश्यक गरज आहे. यामुळं भविष्यातदेखील याला मागणी राहाणार आहे. कोरोनानंतर भविष्यात आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि बिग डेटामुळे कोणते बदल होऊ शकतात कोरोनाच्या या संकटानंतर कामाच्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणखी गरजेची बनली आहे. सुरुवातीला औद्योगिक क्रांतीमुळे जगभरात बदल झाले. डिजिटलायजेशनमुळं जग बदलत आहे. यामुळं कोरोनानंतर याची आणखी गरज वाटू लागली आहे. भविष्यात रोजगार मिळवण्यासाठी या गोष्टींमध्ये बदल होत राहणं गरजेचं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Jobs

पुढील बातम्या