मराठी बातम्या /बातम्या /देश /केरळमध्ये आरएसएसच्या कार्यलयावर बॉम्ब हल्ला, परिसरात तणावपूर्ण वातावरण

केरळमध्ये आरएसएसच्या कार्यलयावर बॉम्ब हल्ला, परिसरात तणावपूर्ण वातावरण

 पय्यानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी घडली. बॉम्ब हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

पय्यानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी घडली. बॉम्ब हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

पय्यानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी घडली. बॉम्ब हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

तिरुअनंतपुरम, 12 जुलै : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात (Bomb hurled at RSS office ) आला आहे. पय्यानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी घडली. बॉम्ब हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्थानिक पोलीस स्टेशन आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ असतानाही हा हल्ला झाला असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते परिसरात येऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे. भाजप नेते टॉम वडक्कन यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना म्हटलं की, असे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य प्रशासनाला जबाबदार धरले पाहिजे. केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सामाजिक संघटनांवर बॉम्ब फेकण्याइतपत खालावली आहे, हे धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सुसंस्कृत समाजात हे मान्य नाही. याआधीही सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या संघ कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. याला पोलीस आणि राज्य प्रशासन जबाबदार आहे. केरळमधील जनता अशा घटना सहन करणार नाही.

गोव्यापाठोपाठ उत्तराखंडमध्येही काँग्रेसला मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम

पय्यानूर येथील आरएसएस कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही 2017 मध्ये जुलै महिन्यात आरएसएसच्या कार्यालयात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना घडवून आणल्याचा आरोप सीपीआय(एम) कार्यकर्त्यांवर करण्यात आला होता.

'अब नही कोई बात खतरे की..'; फोटो शेअर करत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनाही केलं टॅग

यापूर्वी 24 जून रोजी राहुल गांधी यांच्या वायनाड संसदीय कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. काँग्रेसच्या केरळ युनिटने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप केला होता. ही घटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने घडल्याचे काँग्रेसने आरोप केला होता. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड सुरूच ठेवली आणि घटनास्थळी उपस्थित असलेले वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकारी पाहत राहिले, असाही आरोप काँग्रेसने केला होता.

First published:
top videos

    Tags: Bomb Blast, Crime news, RSS