मराठी बातम्या /बातम्या /देश /चेंडू समजून उचलला बाँब, मैदानात खेळताना एका चिमुरड्याचा मृत्यू तर दोन जखमी

चेंडू समजून उचलला बाँब, मैदानात खेळताना एका चिमुरड्याचा मृत्यू तर दोन जखमी

Representative Image

Representative Image

मुलांची उत्सुकता त्यांच्या जीवावर बेतल्याचा प्रकार याठिकाणी घडला आहे. झाडीमध्ये अडकून बसलेल्या चेंडूसारख्या वस्तूवर त्यांनी काठीने मारायला सुरुवात केली. एकाने तर ती वस्तू हातात घेतली आणि...

पाटणा, 02 मार्च: बिहार राज्यातील (Bihar News) खगरियामधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. मुलांच्या उत्सुकतेने एकाचा जीव घेतला आहे तर दोन मुलं जखमी (1 kid killed and 2 injured) झाले आहेत. बिहारमधील खगरिया याठिकाणी बाँब ब्लास्टमध्ये (Bomb Blast in Khagaria) ही घटना घडली आहे. इतर दोन्ही मुलं या प्रकारात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी गोगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भगवान हायस्कूलच्या मैदानात ही घटना घडली. हा प्रकार इतका भयंकर होता की शाळा प्रशासन आणि स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या चिमुरड्यांचे कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का होता.

अशी माहिती समोर येते आहे की,  झाडीमध्ये अडकून बसलेल्या चेंडूसारख्या वस्तूवर त्यांनी काठीने मारायला सुरुवात केली. एकाने तर ती वस्तू हातात घेतली. त्या चिमुरड्यांच्या लक्षात नाही आले की तो बाँब आहे. त्या मुलाने तो बाँब हातात घेताच तो फुटला.

(हे वाचा-हाथरस: मुलीला छेडणाऱ्यांविरोधात तक्रार केल्यामुळे बापाला गमवावा लागला जीव)

खगरियाचे पोलीस उपाधिक्षक मनोज कुमार यांनी अशी माहिती दिली की, स्थानिक लोकांनी त्यांना इस्पितळात दाखल केले. यादरम्यानच 9 वर्षीय मोहम्मद कुर्बानचा मृत्यू झाला. याप्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

(हे वाचा-Kanpur News : कानपूरमध्ये मोठा अपघात, ट्रक उलटून 22 मजूर अडकले, 6 ठार)

दरम्यान तो बाँब तिथे कसा आला, त्यामागे आणखी काही कारण आहे का- याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस याप्रकरणात विविध अँगलने तपास करत असून बाँब ब्लास्ट झालेला परिसर सील करण्यात आला आहे.

First published:

Tags: Bihar, Bomb Blast