नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या औचित्यानं लहानसं भाषण दिलं. जुन्या आठवणी सांगताना मोदी भावूकही झाले. हे भाषण सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतं आहे. रितेश देशमुखनंही (Ritesh Deshmukh) आता या भाषणाबाबत ट्विट (tweet) केलं आहे.
अनेकजण नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं (Narendra Modi speech) कौतुक करत आहेत. यात अभिनेता रितेश देशमुखचीही भर पडली आहे. रितेशनं मोदी यांच्या भाषणाबाबत ट्विट केलं आहे. त्यात रितेश म्हणतो, 'गुलाम नबी आझाद साहेबांना राज्यसभेत निरोप देताना मोदी यांनी भाषण केलं. ते ऐकून मी खरंच भारावून गेलो.' हे ट्विट खूप व्हायरल (viral) झालं आहे. अनेक सोशल मीडिया (Social Media) युजर विविध कमेंट्स करत आहेत.
रितेशनं नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना गुलाम नबी आझाद यांच्याबाबत म्हटलं, की गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) त्या रात्री एअरपोर्टवर (airport) होते. त्यांनी मला फोन केला आणि अगदी कुटुंबातल्या सदस्याची चिंता करावी तशी ते माझी चिंता करत होते. सत्ता आयुष्यात येत जात राहते मात्र तिला पचवायचं कसं हे गुलामजींकडून शिकलं पाहिजे. तो माझ्यासाठी अतिशय हळवा क्षण होता.
#WATCH: PM Modi gets emotional while reminiscing an incident involving Congress leader Ghulam Nabi Azad, during farewell to retiring members in Rajya Sabha. pic.twitter.com/vXqzqAVXFT
गुलाम नबी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मीसुद्धा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आम्ही दोघेही एकमेकांच्या अतिशय जवळ होतो. एकदा गुजरातच्या काही प्रवाशांवर दहशतवाद्यांनी (terrorists) हल्ला केला. त्यात 8 लोक मारले गेले. सर्वात आधी मला फोन आला तो गुलाम नबी आझाद यांचा. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. मी त्यांना म्हणालो, की मृतदेह (dead body) आणण्यासाठी विमान मिळालं तर चांगलं होईल. त्यांनी म्हणलं, तुम्ही चिंता करू नका. मी व्यवस्था करतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला. मी एक मित्र म्हणून गुलाम नबी यांचा आदर करतो. मला खूप विश्वास आहे की देशासाठी काही करण्याची इच्छा गुलाम नबी यांना स्वस्थ बसू देणार नाही. देशाला त्यांच्या आजवरच्या दीर्घ अनुभवाचा नक्कीच लाभ मिळेल.