Home /News /mumbai /

स्वत: ला काय सेलिब्रिटी समजतो का? हायकोर्टाने गजानन मारणेला झापले

स्वत: ला काय सेलिब्रिटी समजतो का? हायकोर्टाने गजानन मारणेला झापले

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही जवळपास 300 चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.

    मुंबई, 16 जून : पुण्यातला कुख्यात गुंड गजानन मारणेनं तळोजा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मिरवणूक काढत पुणे गाठले होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने गजानन मारणेला (gajanan marne) चांगलेच झापून काढले आहे. कोरोनाच्या काळात अशी मिरवणूक काढली, तू स्वत: ला सेलिब्रिटी समजतो का? अशा शब्दांत हायकोर्टाने ( mumbai High Court )मारणेचा चांगलेच फटकारून काढले. फेब्रुवारी महिन्यात तळोजा कारागृहातून बाहेर आल्यानंतर गजानन मारणेच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. त्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून 300 गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रकरणी मारणेला अटक करण्यात आली आणि पुन्हा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. त्याच्याविरोधात 7 एफआयआर नोंदवण्यात आले. हे गुन्हे रद्द करण्यासाठी गजानन मारणेनं याचिका दाखल केली होती. त्याची पत्नी जयश्री मारणेनं सुद्धा याचिका दाखल केली होती. पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये मुलाचा तर सासवडमध्ये आईचा मृतदेह या याचिकेवर सुनावणी दरम्यान, न्यायमूर्तींनी मारणेला चांगलेच फैलावर घेतले.  कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे, पण ते न पाळता तरुंगाच्या दारातून मिरवणूक का काढली आणि ते किती योग्य आहे, असा सवाल हायकोर्टाने विचारला. त्याचबरोबर, मिरवणूक काढण्यासाठी मारणे स्वत:ला काय सेलिब्रिटी समजतो का? समाजात अशा प्रकारे शौर्य दाखवण्याची ही पद्धत नाही, असे खडेबोलही सुनावले, असं वृत्त दैनिक सामनाने दिलं आहे. काय आहे प्रकरण? 16 फेब्रुवारी रोजी अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची  थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही जवळपास 300 चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी पंधरा दिवसात अमोल बधे, पप्पू गावडे आणि एकाचा खून करून मारणे टोळीने दहशतीचा नवा अध्याय शहरात सुरू केला होता.  सलग झालेल्या खूनानंतर शहरात टोळी युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी मारणे टोळीवर मोक्का कायद्याने कारवाई करत जवळपास तीन वर्ष गजानन मारणे याला कारागृहात जेरबंद करून ठेवलं होतं. मात्र, दहशतीच्या जोरावर सीसीटीव्ही सारखे पुरावे असताना ही पुणे शहराच्या मधावर्ती भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एकही साक्षीदार खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलीस टिकवू शकले नाहीत आणि या सगळ्या गुन्ह्यातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाली. जिममध्ये न जाता करा कार्डिओ वर्कआऊट; जाणून घ्या योग्य पद्धत कारागृहातून सुटताना पुन्हा गजा मारणेने दहशतीची झलक दाखवली आणि गजाच्या समर्थकांनी मुंबई आणि पुणे जिल्हा ग्रामीण आणि शहराच्या पोलिसांना आव्हान देत तब्बल 300 पेक्षा जास्त चार चाकी गाड्या घेऊन सव्वाशे किलोमीटर मिरवणूक काढली. त्याचे समर्थक गजा  पुण्याचा किंग असल्याचे शहरात रॉयल एन्ट्री असे व्हिडीओ स्टेटस ठेऊन सोशल मीडियावर दहशत पसरवत असल्याचं समोर आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा मारणेला अटक केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gajanan marane, Mumbai high court

    पुढील बातम्या