'भाजपला मिळणार 300 जागा'; ज्योतिष प्राध्यापकाची काँग्रेस सरकारकडून उचलबांगडी

'भाजपला मिळणार 300 जागा'; ज्योतिष प्राध्यापकाची काँग्रेस सरकारकडून उचलबांगडी

भाजपला 300 जागा मिळणार अशी भविष्यवाणी वर्तवल्यानं प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 09 मे : लोकसभा निवडणुका, प्रचार, आरोप – प्रत्यारोप, विजयाची आकडेवारी या साऱ्या गोष्टी सध्या देशात जोरात सुरू आहे. अनेक जण आता सत्ताधारी भाजप आणि विरोधकांना किती जागा मिळणार यावर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. राजकीय पंडित असो अथवा सामान्य माणूस यामध्य कुठेच मागे नाही. मध्य प्रदेशातील विक्रम विश्वविद्यालयातील ज्योतिष प्राध्याप्रकानं भाजपला 300 जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली. राजेश्वर शास्त्री मुसळगांवकर असं या प्राध्यापकाचं नाव आहे. त्यानंतर वादाला सुरूवात झाली. फेसबुकवर राजेश्वर शास्त्री मुसळगांवकर यांनी पोस्ट लिहिल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आचारसंहिताभंगाच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

28 एप्रिल रोजी राजेश्वर शास्त्री मुसळगांवकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली. त्यानंतर बुधवारी विद्यापाठानं त्यांना निलंबित केल्याची माहिती दिली. पण, राजेश्वर शास्त्री मुसळगांवकर यांनी आपली पोस्ट फेसबुकवरून हटवली होती. शिवाय, माफी देखील मागितली होती. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी माझ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे अंदाज वर्तवला. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफी असावी असं म्हटलं होतं.

वीर सावरकरांचा अपमान, कर्मफळ येथेच आहे!, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा

भाजपची टीका

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारनं केलेल्या कारवाईनंतर आता भाजपनं राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. विविध विषयांवर भविष्य वर्तवणे हा ज्योतिषांच्या अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्राध्यापक राजेश्वर शास्त्री मुसळगांवकर यांच्यावर केलेली कारवाई ही चुकीचं आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी भाजपनं केली आहे. पण, सरकार, विद्यापीठाकडून भाजपच्या मागणीवर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

SPECIAL REPORT : दुर्योधन ते औरंगजेब... राजीव गांधींवरील टीकेनंतर PM मोदी टार्गेटवर

First published: May 9, 2019, 9:08 AM IST

ताज्या बातम्या