जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, नव्या बाधितांचा आकडा थेट 26 हजार पार

Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, नव्या बाधितांचा आकडा थेट 26 हजार पार

Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, नव्या बाधितांचा आकडा थेट 26 हजार पार

महाराष्ट्रात आज दिवसभरात 26 हजार 538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा हातपाय पसरु लागला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झालेली बघायला मिळतेय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात काल 18 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. पण आज हाच आकडा थेट 26 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये प्रचंड मोठी रुग्णवाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आजच्या नव्या रुग्णसंख्येने तर कोरोनाच्या गेल्या दोन लाटांचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आज दिवसभरात 26 हजार 538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 331 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.55 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात दिवसभरात ओमायक्रोनचे 144 नवे रुग्ण राज्यात दिवसभरात ओमायक्रोनच्या 144 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी मुंबईतील 100 रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नागपुरातील 11 रुग्णांचा समावेश आहे. तसेच ठाणे आणि पुणे मनपा हद्दीत 7 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरला 5, अमरावती, उल्हासनगर, भिवंडी महापालिका हद्दीत प्रत्येकी दोन नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच पनवेल आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. हेही वाचा :  मुंबईत कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांनी पहिल्या-दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड मोडला, आकडा थेट 15 हजार पार मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ  मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तर आज पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेचाही रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारं आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.

पुण्यात दिवसभरात तब्बल 1805 नवे रुग्ण

पुण्यात गेल्या 24 तासात फक्त पुण्यात तब्बल 1 हजार 805 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे शहर सर्वाधिक बाधित ठरले होते. त्यानंतर आतादेखील हे दोन मोठी शहरं मोठ्या प्रमाणात बाधित ठरताना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी मृत्यूच्या आकड्यांमध्ये सध्यातरी वाढ झालेली नाहीय. पुण्यात आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय. तर 131 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात