मराठी बातम्या /बातम्या /देश /भाजपच्या मुस्लीम नेत्याने मशिदीला दान केले कुलर, नमाजींनी अक्षरशः उचलून फेकून दिले

भाजपच्या मुस्लीम नेत्याने मशिदीला दान केले कुलर, नमाजींनी अक्षरशः उचलून फेकून दिले

 भाजपचं कौतुक करताना अन्वर म्हणाले, 'भाजपने तिहेरी तलाक विधेयक आणून मुस्लीम महिलांसाठी मोठं काम केलं आहे. मुस्लीम महिला खूप खूश आहेत. काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काही केलं नाही, फक्त त्यांचा वापर केला आहे.'

हैदराबाद, 10 एप्रिल : भाजप आपल्या मुस्लीम नेत्यांच्या माध्यमातून तेलंगणातील अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या प्रयत्नात भाजप नेत्यांना अनेक अडचणी येत आहेत. अशाच एका प्रकरणात भाजपच्या एका मुस्लीम नेत्याला त्यांच्याच समाजाच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. या भाजप नेत्यानं मशिदीसाठी कुलर दान केले. मात्र, नमाजींनी ही देणगी नाकारत सर्व कुलर उचलून मशिदीबाहेर फेकले.

तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील भाजप नेते मोहम्मद अन्वर यांनी नमाजींना उष्णतेपासून आराम मिळावा, यासाठी मशिदीला अनेक कुलर दान केले. यावेळी ते मशिदीत उपस्थित लोकांना म्हणाले, 'भाजपने मुस्लिमांसाठी खूप काही केलं आहे. भाजपचे मुस्लिमांवर खूप प्रेम आहे. खरं तर काँग्रेसनं मुस्लिमांना भाजपपासून दूर ठेवले आहे.'

हे वाचा - तोफगोळ्यासारखी आली BMW, दुभाजकापलीकडे महिलेला उडवलं, खतरनाक VIDEO

ते पुढे भाजपचं कौतुक करताना म्हणाले, 'भाजपने तिहेरी तलाक विधेयक आणून मुस्लीम महिलांसाठी मोठं काम केलं आहे. मुस्लीम महिला खूप खूश आहेत. काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काही केलं नाही, फक्त त्यांचा वापर केला आहे.' सध्या मुस्लीम समाजातील लोक भाजपसह मोहम्मद अन्वर यांचा निषेध करत आहेत.

हे वाचा - फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय बोलतो माहीत आहे का?

भाजप नेते मोहम्मद अन्वर यांच्या वतीने मशिदीला कुलर दान केल्यानंतरही विकाराबादच्या मुस्लीम जनतेनं त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. मोहम्मद अन्वर यांनी मशिदीला दिलेले कुलर मुस्लीम लोकांनी उचलले आणि बाहेर फेकले. त्यानंतर सर्व कूलर मशिदीतून बाहेर आणून अन्वर यांच्या घराबाहेर आणून फोडले गेले. ही घटना विकाराबाद जिल्ह्यातील बवंतराम मंडळातील तोरुमामिडी भागातील आहे.

First published:

Tags: BJP, Hyderabad, Masjid, Muslim, Telangana