कोलकाता 25 मार्च : पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट येथे परस्पर वैमनस्यातून 8 लोकांना जिवंत जाळून मारल्याची घटना समोर आली आहे (Birbhum Violence). तेव्हापासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही आक्रमकपणे लावून धरली आहे. अशात आता रूपा गांगुली यांनी राज्यसभेतच याविरोधात आवाज उठवला आहे. याबद्दल बोलताना गांगुली यांनी अश्रू अनावर झाले. पश्चिम बंगाल : बीरभूम जिल्ह्यातल्या जाळपोळीच्या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना, 10 जणांची झाली जाळून हत्या बीरभूम घटनेवर बोलताना भाजप खासदार म्हणाल्या, “आम्ही पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करतो. तिथे सामूहिक हत्या होत आहेत, लोक तिथून पळून जात आहेत…ते राज्य आता राहण्यायोग्य राहिलेलं नाही.”
BJP MP Roopa Ganguly breaks down in Rajya Sabha over Birbhum incident, said "We demand President's rule in West Bengal. Mass killings are happening there, people are fleeing the place... the state is no more liveable." pic.twitter.com/tPzp30loAi
— ANI (@ANI) March 25, 2022
पुढे त्या म्हणाल्या की ‘पश्चिम बंगालमधील लोक खुलेपणाने बोलूही शकत नाहीत. तिथलं सरकार नराधमांना संरक्षण देत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सरकार आपल्याच राज्यातील लोकांना मारतं, हे इतर राज्यांमध्ये पाहायला मिळणार नाही. आपण माणसं आहोत. आम्ही दगडफेकीचं राजकारण करत नाही’
बीरभूम जिल्ह्यातील रामपूर हाट येथील बगुटी गावातील रहिवासी पंचायत उप-प्रधान भादू शेख यांच्या हत्येनंतर सोमवारी, 21 मार्च रोजी त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ केली होती. त्यांनी अनेक घरांना बाहेरून कुलूप लावून आग लावली. यामुळं 8 जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला होता. यातील 7 जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे.