Home /News /national /

'1 किलो वजन कमी करा आणि 1000 कोटी मिळवा'; गडकरींचं चॅलेंज स्विकारत खासदाराने घटवलं 15 KG, आता..

'1 किलो वजन कमी करा आणि 1000 कोटी मिळवा'; गडकरींचं चॅलेंज स्विकारत खासदाराने घटवलं 15 KG, आता..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की फिरोजिया यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पैसा हवा असेल, तर ते जितकं किलो वजन कमी करतील, तितकं मोठं पॅकेज त्यांना दिलं जाईल. गडकरी म्हणाले होते की 1 किलो वजन कमी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज मिळेल

पुढे वाचा ...
    भोपाळ 12 जून : मध्य प्रदेशातील उज्जैन लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार अनिल फिरोजिया सध्या त्यांच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहेत (BJP MP takes up Gadkari's challenge). केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की फिरोजिया यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पैसा हवा असेल, तर ते जितकं किलो वजन कमी करतील, तितकं मोठं पॅकेज त्यांना दिलं जाईल. गडकरी म्हणाले होते की 1 किलो वजन कमी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज मिळेल, जे अनिल फिरोजिया त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील विकासकामांवर खर्च करू शकतात. यानंतर आता या खासदाराचा दावा आहे, की त्यांनी 15 किलो वजन कमी केलं आहे (BJP MP fulfilled Nitin Gadkari's challenge) . आठ वर्षांनंतर वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला, राहुल यांच्या फेवरेट नेत्याची शिकार करणारे कार्तिकेय शर्मा कोण आहेत? वजन कमी करण्याच्या आव्हानाला यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरुवात झाली. पहिल्यांदाच खासदार झालेल्या फिरोजिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये त्यांचं वजन 127 किलो होतं. ते म्हणाले, 'गडकरींनी मला तंदुरुस्त होण्यासाठी प्रेरित केलं आणि फेब्रुवारीमध्ये याबद्दलची घोषणा झाली. ते म्हणाले होते की, मी कमी केलेल्या वजनाच्या प्रति किलोग्रॅमवर 1,000 कोटी रुपये गडकरी विकासकामांसाठी देतील. मी त्याचं पालन केलं आणि गेल्या चार महिन्यांत माझं 15 किलो वजन कमी झालं'. Haryana Rajya Sabha Election Result: एका मतानं उलटला गेम, हरियाणातही महाराष्ट्रासारखाच ड्रामा; कसे हरले Congress चे माकन फिरोजिया म्हणाले, फिटनेस चार्ट लक्षात घेऊन मी वजन कमी करत आहे. ज्यामध्ये डाएट प्लॅन फॉलो करणं आणि शारीरिक व्यायाम, सायकलिंग तसंच योगा यांचा समावेश आहे. माझं वजन पूर्वी १२७ किलो होतं. आता माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी 15 हजार कोटी रुपयांची मागणी करण्याचा मला अधिकार आहे. कारण मी 15 किलो वजन कमी केलं आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघाला विकासासाठी अधिकाधिक पैसे मिळावेत यासाठी आपलं वजन कमी करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Nitin gadkari

    पुढील बातम्या