जाहिरात
मराठी बातम्या / देश / चीनसोबत सीमा संघर्षात भारताचे 'या' क्षेत्रात होऊ शकते मोठे नुकसान

चीनसोबत सीमा संघर्षात भारताचे 'या' क्षेत्रात होऊ शकते मोठे नुकसान

चीनसोबत सीमा संघर्षात भारताचे 'या' क्षेत्रात होऊ शकते मोठे नुकसान

चीनकडून भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. वाढलेल्या गुंतवणुकीमुळे देशाच्या बाजारपेठेतील चीनची पकड अधिक घट्ट झाली असल्याचे बोलले जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून : पूर्वोत्तर लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत - चीन सीमावादावरून दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतातील गुंतवणुकीसह  स्टार्टअप कंपन्यांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनकडून भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक  करण्यात आली आहे. वाढलेल्या गुंतवणुकीमुळे देशाच्या बाजारपेठेतील चीनची पकड अधिक घट्ट झाली असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही  देश एकमेकांवर आर्थिक स्वरूपात बऱ्याच अंशी अवलंबून असल्याने सीमेवरील वाढता तणाव दोन्ही देशांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. सोबतच याचा भारताला सर्वात  जास्त फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग चीनच्या अनेक मोठ्या कंपन्यांनी गेल्या 5 ते 6 वर्षात भारतातील गुंतवणुकीत वाढ केली आहे. एका अहवालानूसार भारतातील 30 पैकी 18 यूनिकॉर्नमध्ये (एक अब्ज डॉलर अथवा त्याहून अधिक मूल्य असलेले स्टार्टअप) चीनची मोठी भागीदारी आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज’ अंतर्गत स्थानिक उद्योगांना चालना देत चीनच्या मालावर बहिष्कार टाकून त्याला आर्थिक आव्हान दिले जावू शकते, असं मत व्यक्त केले जात आहे. VIDEO : चिनी वस्तू नको म्हणजे नकोच! पहिल्या मजल्यावरुन फेकून दिला TV आणि… गेल्या 7 वर्षात 2017 मध्ये सर्वात जास्त 1 हजार666 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक चीनच्या कंपन्यांनी भारताच्या स्टार्टअपमध्ये केली होती. एका अहवालानूसार 2014 मध्ये चायनीज कंपनीने भारतात 51 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. 2019 मध्ये त्यात वाढ होवून ती 1 हजार 230 दशलक्ष डॉलर पर्यत पोहचली. चीनच्या ज्या कंपन्यांनी भारतात मोठी गुंतवणूक केली आहे त्यात अलीबाबा, टेंशेट तसेच टीआर कॅपिटलसह आदींचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात