पाटणा 18 एप्रिल: मध्य प्रदेशमध्ये माजी मंत्री अजय विश्नोईंनंतर आता भाजपच्या आणखी एका नेत्याने (BJP Leader Post) स्वत:च्याच सरकारविरोधात (Madhya Pradesh Government) पोस्ट केली आहे. विश्नोईंच्या पाटण विधानसभा मतदार संघातील नुन्सरचे विभागीय अध्यक्ष यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारला घेराव घातला आहे. नुन्सर मंडळाचे अध्यक्ष अजय पटेल यांनी शिवराज सिंह चौहान सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अजय पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, की 'आमच्या मध्य प्रदेशातील बिनकामाचा मुख्यमंत्री. मी स्वतः मंडळ अध्यक्ष त्यांचा विरोध करतो, पुढे काहीही होवो. कारण, मी स्वतः माझ्या जवळच्या व्यक्तींना डोळ्यासमोर जीव गमावताना पाहिलं आहे. आदरणीय शिवराजसिंह चौहान, मी तुमच्या पक्षाचा नुन्सर येथील विभागीय अध्यक्ष बोलत आहे. मी माझ्या कुटुंबासाठी इंजेक्शनची व्यवस्था करू शकत नसल्यास, मी हे स्वतःच अपयश समजू की या सरकारचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
'दबाव टाकला जातोय', ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर आरोप
या पोस्टवरुन अंदाज लावला जावू शकतो, की आरोग्य सुविधा पुरेशा नसल्यानं भाजप कार्यकर्तेदेखील आपल्याच सरकारवर नाराज आहेत. या पोस्टमुळे काँग्रेसला भाजपला घेरण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी ही पोस्ट म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. दिनेश यादव म्हणाले की, आज ज्या काही व्यवस्था दिसत आहेत त्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
अजय विश्नोई यांनीही केलं होतं सरकारविरोधात ट्विट -
अजय विश्नोई यांनी आपल्या ट्विटमधून कोरोना रुग्णांची एकूण संख्या आणि त्यांच्यावर खर्च केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची तुलना महाराष्ट्रासोबत केली होती. त्यांनी ट्विट करत लिहिलं होतं, की मुख्यमंत्री जी कृपया लक्ष द्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात 50000 रुग्ण होते आणि ऑक्सिजन 457 मेट्रीक टन खर्च झाला होता. मात्र, मध्यप्रदेशात फक्त 5000 रुग्णांवर 732 मेट्रीक टन ऑक्सिजन का खर्च झाला?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Corona, Madhya pradesh, Shivraj singh chauhan, Social media viral, Viral post