मराठी बातम्या /बातम्या /देश /या राज्यात भाजप करणार Love Jihad विरोधी कायदा; लग्नासाठी धर्मांतर करायला लावलं तर अजामीनपात्र गुन्हा

या राज्यात भाजप करणार Love Jihad विरोधी कायदा; लग्नासाठी धर्मांतर करायला लावलं तर अजामीनपात्र गुन्हा

लव्ह जिहाद (Love johad) हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची तरतूद त्यात असेल आणि त्यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूदही असेल.

लव्ह जिहाद (Love johad) हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची तरतूद त्यात असेल आणि त्यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूदही असेल.

लव्ह जिहाद (Love johad) हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची तरतूद त्यात असेल आणि त्यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूदही असेल.

भोपाळ, 17 नोव्हेंबर : Love Jihad ला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध नेहमीचा आहे. लग्नासाठी धर्म बदलायला लावतात, असा त्यांचा आरोप असतो. अशा धर्मांतराला कायद्याने बंदी असावी, अशीही मागणी होत होती. आता प्रत्यक्षात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा (Love jihad law) करण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. शिवराज सिंह चौहान (Shivraj singh chauhan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने असा कायदा आणण्याची तयारी केली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशात योगी सरकारनेसुद्धा लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार मध्य प्रदेशचे (Madhya pradesh) गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी सांगितलं की, विधानसभेच्या येत्या अधिवेशनात शिवराज सरकार धर्म स्वातंत्र्य अबाधित राखणारा कायदा मांडणार आहे. हा कायदा संमत झधाला की, लग्नानंतर धर्मांतर करायला लावणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. लव्ह जिहाद हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची तरतूद त्यात असेल आणि त्यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूदही असेल.

स्वेच्छेनं धर्मांतर करायचं असेल तर?

लव्ह जिहादमध्येम मुख्य आरोपीलाच नाही, तर त्याचे साथीदार किंवा सहआरोपींनासुद्धा जामीन मिळणार नाही. लग्नानंतर स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्यांनी त्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यासाठी अर्ज करावा लागेल. असा अर्ज न केल्यास ते सक्तीचं धर्मांतर ठरेल आणि लव्ह जिहादचा प्रयत्न म्हणून या प्रकरणी धर्मांतर करायला लावणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल, असं मध्य प्रदेशचे गृहमंत्री  नरोत्तम मिश्र यांनी सांगितलं.

गुपचूप केलेलं लग्न, बळजबरीने केलेलं धर्मांतर हे या कायद्याअंतर्गत रद्दबातल ठरवण्यात येईल.

First published:
top videos

    Tags: Love jihad, Madhya pradesh