नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी वेगात सुरू असून राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक नेत्यांकडून भविष्यातील राजकीय गणितांबद्दल दावे करण्यात येत आहेत. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘न्यूज 18’चे मुख्य संपादक राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत पुन्हा भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहतील याबाबतचे संकेत दिले आहेत. तसंच उपमुख्यमंत्रपदाबाबतही भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती आहे. मात्र भाजपलाही स्वबळावर बहुमताचा आकडा पार होईल. मुख्यमंत्री आमचाच होईल आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम निर्णय घेईल,’ असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तेत समसमान वाट मागणाऱ्या शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रिपद जाईल, असं थेटपणे सांगणं अमित शहा यांनी टाळल्याचं पाहायला मिळत आहे. News18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमित शहा यांनी इतरही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. या मुलाखतीतले प्रमुख मुद्दे : - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकतं. - भाजपच्या यशाचं प्रमाण पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वेगवेगळं असलं, तरी प्रत्येक ठिकाणी भाजपने आपला रस्ता निश्चित केला आहे. वाचा - उद्धव ठाकरेंनी केलेल्या जहरी टीकेवर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया - जम्मू काश्मीरमध्ये प्रशासनाच्या मदतीने पुढच्या 15 वर्षांच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे. - मॉब लिंचिंग पूर्वीसुद्धा होत होतं. आपल्याला तो एक सामाजिक प्रश्न म्हणून सोडवायचा आहे की, त्याचं राजकारण करायचं आहे? वाचा …त्यापेक्षा मी मेलेलं बरं, उदयनराजेंचा ‘त्या’ वक्तव्यावर संतप्त खुलासा - हिंदी दिवस - हिंदीच्या आग्रहाबद्दल माझ्या भाषणाचा गैरअर्थ काढण्यात आला. मी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर असं म्हणालो होतो. आमचं धोरण स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याचंच आहे. - राम मंदिर - रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल, त्याचा आदर केला जाईल. VIDEO : मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.