दिनेश केळुसरकर, 16 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली इथं सभा घेत नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सोनियांना मी शुभेच्छा दिल्या होत्या, तशाच शुभेच्छा आज भाजपला देतोय. पण तुमच्याकडे ही प्रवृत्ती असता कामा नये. युतीतला हा मीठाचा खडा वेळेतच बाजूला करू, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर आता नारायण राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी अशा गोष्टी कधी पचवत नाही. पचवणार पण नाही. माहिती घेतो आणि बोलतो,’ असं नारायण राणे म्हणाले आहेत. या प्रतिक्रियेतून राणे यांनी भविष्यातही शिवसेनेविरुद्धचा संघर्ष आक्रमकपणे करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राणेंच्या भाजपप्रवेशानंतरही शिवसेना आणि त्यांच्यातील वाद मिटणार नसल्याचं दिसत आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? - उध्दव ठाकरेंनी राणेंना दिली मायावी राक्षसाची उपमा - मुख्यमंत्र्यांनी राणेंना घेण्यात खरं तरं पाच वर्षे थांबायला हव होतं - आज जर खूष असेल तर तो स्वाभिमान हा शब्द. कारण स्वाभिमान शब्दाची आज सुटका झाली - माझ्या मित्राचं सुध्दा वाईट व्हावं अशी इच्छा नाही. म्हणून सेना उमेदवार निवडून यायला हवा - शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तर भाजपाचंही भल होईल मुख्यमंत्र्यांनी उमेदवार जिंकावा म्हणून घेतली सभा, आता त्यालाच पाडण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात! शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रिपणे लढत असले तरीही या युतीत सर्वच काही आलबेल आहे, असं नाही. काही जागांवर तर शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. असं असतानाही मात्र दोन्ही पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्गात दोन प्रचार सभा घेतल्या. कणकवलीत सतीश सावंत आणि वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी या सभा झाल्या. कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत हे आमने सामने असल्यामुळे उध्दव यांची कणकवलीतली सभा विशेष महत्वाची ठरली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंगळवारी कणकवलीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या नितेश राणे यांच्यासाठी सभा घेवून शिवसेनेवर जराही टीका न करता नितेश राणेना 80% मतं मिळतील असा दावा केला होता. VIDEO : मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.