Home /News /national /

पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा, भाजप - तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, 5 आमदार निलंबित

पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा, भाजप - तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, 5 आमदार निलंबित

पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा, भाजप - तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, 5 आमदार निलंबित

पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा, भाजप - तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, 5 आमदार निलंबित

5 BJP MLAs including Suvendu Adhikari suspended from West Bengal Assembly: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला आहे.

    कोलकाता, 28 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभेत (West Bengal Assembly) सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिंसाचारावर (birbhum violence) चर्चेची मागणी करत भाजप आमदारांनी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चक्क हाणामारी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदनातील कामकाजादरम्यान भाजप आमदार मनोज टिग्गा आणि तृणमूल काँग्रेसचे असित मजुमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. ज्यामध्ये असित मजुमदार हे जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे 5 आमदार निलंबित विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. सुवेंदू अधिकारी यांच्याशिवाय भाजपच्या ज्या आमदारांना निलंबित करण्यात आले आहेत त्यामध्ये मनोज टिग्गा, दीपक बर्मन, नरहरी महतो आणि शंकर घोष यांचा समावेश आहे. वाचा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न,घटनेचा VIDEOआला समोर भाजपकडून हल्ल्याचा व्हिडीओ ट्विट भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. भाजपने आरोप केला आहे की, बीरभूम हिंसाचार प्रकरणात आम्हाला चर्चा करायची होती. पण तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी धक्काबुक्की केली. वाचा : 'मी फोटो काढला आणि credit घेतलं...', Smriti Iraniचं ट्विट व्हायरल ममता बॅनर्जी सरकारच्या मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, भाजप आमदारांचे निलंबन करण्यात यावे. विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी म्हटलं, आमदारांच्या या कृत्याने सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या एकूण पाच आमदारांना विधानसभेच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या हस्तक्षेपाची गरज - सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, बीरभूम हिंसाचार प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ झाला. किमान शेवटच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची मागणी विरोधकांनी केली आणि ती मागणी सरकारने नाकारली. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आमच्या 8-10 आमदारांसोबत हाणामारी करण्यासाठी कोलकाता पोलीस कर्मचाऱ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये सभागृहात आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, TMC, West bengal

    पुढील बातम्या