नवी दिल्ली, 26 मार्च : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल (Smriti Irani Tweet Viral) होत आहे. स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांच्या शपथविधीदरम्यानचा फोटो क्लिक केला होता. त्यांच्या या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), अमित शाह (amit shah), राजनाथ सिंह (Rajnath Singh), नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि जेपी नड्डा (JP Nadda) असे भाजपचे (bjp) बडे नेते एका फ्रेममध्ये दिसत आहेत. मात्र, त्यांनी काढलेल्या या फोटोचं श्रेय दुसऱ्याच कुणाला तरी देण्यात आलं. त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करत छोटीशी तक्रार केली आहे. स्मृती इराणी यांनी 26 मार्चला त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे छायाचित्र पोस्ट केलं होतं. ज्याचं कॅप्शन आहे - माझं कुटुंब, भाजप परिवार. छायाचित्रात पंतप्रधान मोदींसह भाजपचे इतर दिग्गज नेते दिसत आहेत. मात्र, त्यांनी क्लिक केलेल्या या फोटोचं क्रेडिट एएनआय या वृत्तसंस्थेला देण्यात आलं आहे.
मेरा परिवार #भाजपापरिवार 🙏 pic.twitter.com/AapXyh0iCf
— Smriti Z Irani (@smritiirani) March 25, 2022
ज्यानंतर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया देत ट्विटरवर लिहिलं - ‘मी फोटो काढला, क्रेडिट ANI ला गेलं.’ यासोबत त्यांनी एक दुःखी इमोजीही शेअर केला आहे.
photo maine kheenchi credit @ANI ko gaya 😔 pic.twitter.com/gYW3u8mGSA
— Smriti Z Irani (@smritiirani) March 26, 2022
स्मृती यांच्या ट्विटवर मिळालं हे उत्तर स्मृती इराणींच्या या ट्विटला उत्तर देताना एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी लिहिलं- ‘बड़े-बड़े शहरों में ऐसी छोटी-छोटी बातें हो जाती हैं सेनोरिटा.’ यासोबत त्यांनी प्रेमाचा इमोजी शेअर केला आहे.
“Bade bade shehron mey aisi choti choti batein hoti hain senorita!” 💕 https://t.co/WTR5GezJ2o
— Smita Prakash (@smitaprakash) March 26, 2022
स्मिता प्रकाश यांच्या या उत्तराला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी लिहिलं - ‘सेनोरिटा बड़े देश के बड़े एडिटर ऐसा बोलेंगे तो छोटे लोगों का क्या होगा. ANI च्या बाबतीत PTI नं असंच केलं असतं तर कल्पना करा.’ यावर स्मिता प्रकाश लिहितात, ‘माफ करा, सर्व सब्सक्रायबर्सना सुधारणा करण्यास सांगितलं आहे.’ युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्र्यांच्या या ट्विटवर ट्विटर यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेव्हा एकानं (@PrasadKarwa) स्मृती इराणी यांना विचारलं की, त्यांनी ANI ला जॉईन केलं आहे का? तर त्यावर स्मृती म्हणाल्या, ‘आता एवढंच उरलं होतं आयुष्यात.’ त्याचबरोबर अनेक यूजर्सनी असा फोटो क्लिक केल्याबद्दल स्मृती इराणी यांचं अभिनंदनही केलं आहे. लोक त्याच्या फोटोग्राफी कौशल्याचं कौतुक करत आहेत. You joined ANI?
You joined ANI? 😅
— Prasad Karwa (@PrasadKarwa) March 26, 2022
तुमच्या कॅमेऱ्याचा हा अपमान भारत सहन करणार नाही