पाटणा, 27 मार्च : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्यावर एका व्यक्तीने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील बख्तियारपूर येथे ही घटना घडली आहे. रविवारी नितीश कुमार हे बख्तियारपूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते त्यावेळी या व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्लेखोर एक मानसिक रुग्ण असल्याचं बोललं जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ या हल्लेकोराला ताब्यात घेतले. सुदैवाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये.
In a viral video, #Bihar Chief Minister Nitish Kumar was seen getting slapped by a man on Sunday.#NitishKumar pic.twitter.com/4teBROeeld
— News18.com (@news18dotcom) March 27, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळ एक तरुण जबरदस्तीने जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच दरम्यान त्याने अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिशेने धाव घेत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.
वाचा : 11 वर्षानंतर Congress खासदाराला भारी पडलं प्रकरण, कोर्टानं सुनावली शिक्षा
यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेसाठी तैानात असलेल्या जवानांनी त्या माणसाला पकडले. सुरक्षारक्षकांनी त्या आरोपी तरुणाला पकडून स्थानिक पोलिसांच्या हवाले केले आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण कोण आहे आणि त्याने असं कृत्य का केलं? याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाटणा जिल्ह्यातील बाढ, बख्तियारपूर आणि नालंदा या गावांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते नागरिकांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत. नितीश कुमार यांचे बाढ आणि बख्तियारपूर या भागातील नागरिकांसोबत एक जुने आणि दृढ संबंध असल्याचं बोललं जातं.
यापूर्वीही झाली आहे हल्ल्याची घटना
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला झाला होता. जेव्हा नितीश कुमार मधुबनीच्या हरलाखी विधानसभा मतदारसंघात पोहोचले होते. नितीश कुमार एका रॅलीला संबोधित करत होते तेव्हा त्यांच्यावर कांदा आणि दगडफेक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Nitish kumar