बंगळुरू, 14 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढते आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाव्हायरसशी दोन हात करत असतानाच आता सरकारसमोर आणखी 2 संकटं उभी राहिली. कोविड-19 (COVID-19) सह आता बर्ड फ्लू (H5N1 Virus - Bird flu) आणि स्वाईन फ्लू (H1N1 Virus - swine flu) चं आव्हान आहे. काही राज्यांमध्ये या आजारांची प्रकरणं समोर आलीत.
अगदी महाराष्ट्राशेजारी (maharashtra) असलेल्या कर्नाटकात (karnataka) बर्ड फ्लू आला आहे. मैसूर आणि देवांगरी जिल्ह्यात पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे या भागात चिकन आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे वाचा - महाभयंकर विषाणूबाबत बिल गेट्स यांनी 5 वर्षांपूर्वीच केली भविष्यवाणी, पाहा VIDEO
दरम्यान याआधी केरळमध्येही बर्ड फ्लूची प्रकरणं दिसून आली. त्यानंतर केरळ सरकारने परप्पनंगडी, कोझिकोडमध्ये कोंबड्यांना मारण्याचा आदेश दिलेत. एएनआयने याबाबत ट्विट केलं होतं.
Malappuram: Kerala government has ordered poultry culling after Bird flu was detected in Parappanangadi; Disease Inspection Officer, says, "10 special squads have been deployed to cull all poultry within 1km radius of the epicentre". pic.twitter.com/VKpgdiKGOg
— ANI (@ANI) March 14, 2020
केरळशिवाय उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही या आजारांचा धोका वाढला आहे, दैनिक जागरणनं याबाबत वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशातही बर्ड फ्लूचा अलर्ट
उत्तर प्रदेशात गेल्या महिनाभरापासून बर्ड फ्लूबाबत संकेत मिळत आहेत. वाराणसीमध्ये दीड महिन्यात पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची प्रकरणं आहेत. यापैकी काही पक्ष्यांना बर्ड फ्लू असल्याचं निदान झालं. तर मेरठमध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण दिसून आलेत.
बिहारमध्येही बर्ड फ्लू असण्याची शक्यता, स्वाईन फ्लूचे रुग्ण
जानेवारीच्या अखेरीस बिहारमध्ये बर्ड फ्लूने डोकं वर काढल्याची शक्यता दिसन आलं. पटनामध्ये कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, मात्र स्थानिक प्रशासनाने परिसरात अलर्ट जारी करून सर्व पोल्ट्री फार्मवर तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
बिहारमध्ये 8 दिवसांत स्वाईन फ्लूचे 6 रुग्ण आढळलेत. सुरुवातीला पटना आणि त्यानंतर शास्त्रीनगर, रामकृष्ण नगर, गया घाट, मच्छरहट्टामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण समोर आलेत.
पश्चिम बंगालमध्ये स्वाईन फ्लूचे 13 रुग्ण
पश्चिम बंगालमध्ये 13 स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. अजून काही संशयित रुग्णांची तपासणी सुरू आहे.
हे वाचा - पुणेकरांनो सावधान! तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट तर नाही ना?, लाखोंचा माल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Swine flu