जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'इतर राज्यांमध्येही असं घडतं' Birbhum Violence प्रकरणी 10 जणांच्या मृत्यूवर ममतांचं वक्तव्य

'इतर राज्यांमध्येही असं घडतं' Birbhum Violence प्रकरणी 10 जणांच्या मृत्यूवर ममतांचं वक्तव्य

'इतर राज्यांमध्येही असं घडतं' Birbhum Violence प्रकरणी 10 जणांच्या मृत्यूवर ममतांचं वक्तव्य

ममता म्हणाल्या, ‘बीरभूममधील घटनेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. परंतु, अशा घटना उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये वारंवार घडतात. आम्ही योग्य पद्धतीनं कारवाई करू. सरकार आमचं आहे, आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे.’

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 23 मार्च : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) म्हणाल्या की, बीरभूम हिंसाचारावर (Birbhum Violence) राजकारण केलं जात आहे. त्या म्हणाली की, त्या या घटनेचं समर्थन करू शकत नाहीत; परंतु, इतर राज्यांमध्येही असं घडतं. सोमवारी बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट जवळील एका गावात अनेक झोपड्यांना आग लावण्यात आली. त्यामध्ये दोन लहान मुलं आणि तीन महिलांसह 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ममता म्हणाल्या, ‘बीरभूममधील घटनेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. परंतु, अशा घटना उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये वारंवार घडतात. आम्ही योग्य पद्धतीनं कारवाई करू. सरकार आमचं आहे, आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे. कोणालाही त्रास होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. बीरभूम, रामपुरहाटची घटना दुर्दैवी आहे. मी ओसी, एसडीपीओ यांना तत्काळ बडतर्फ केलं आहे. कठोर कारवाई केली जाईल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचं बॅनर्जी यांनी सांगितलं. “बीरभूम घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत,” असं त्या म्हणाल्या. तसंच, ‘परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या भागात जायचं होतं. मात्र, इतर राजकीय पक्ष आधीच तेथे आहेत. त्यामुळं मला माझा दौरा स्थगित करावा लागला,’ असं त्या म्हणाल्या. भाजपवर निशाणा साधला विरोधी भारतीय जनता पक्षाचे नेते घटनास्थळी जाताना ‘लंगचा’ (शेजारच्या बर्दवान जिल्ह्यातील शक्तीगढ भागात बनवलेली मिठाई) खाण्यासाठी थांबले, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. हे वाचा -  पश्चिम बंगाल : बीरभूम जिल्ह्यातल्या जाळपोळीच्या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना, 10 जणांची झाली जाळून हत्या

 ‘हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही’

भाजपच्या नऊ खासदारांच्या शिष्टमंडळानं दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयानं पश्चिम बंगाल सरकारकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. बंगालमध्ये येण्यापासून मी कोणालाच रोखणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, ‘हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. मी तृणमूल काँग्रेसचं शिष्टमंडळ हाथरसला पाठवलं होतं. पण आम्हाला प्रवेश देण्यात आला नाही. पण आम्ही कोणालाच इथे येण्यापासून रोखत नाही.’

काय होतं हिंसाचाराचं कारण? ही घटना सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पंचायत अधिकाऱ्याच्या हत्येचा बदला म्हणून घडल्याचं मानलं जात आहे. वकील तरुण ज्योती तिवारी यांनी मंगळवारी सांगितलं होतं की, त्यांनी आणि भाजपच्या वकील सेलच्या इतर नऊ सदस्यांनी विभागीय खंडपीठासमोर या घटनेविषयीची याचिका न्यायालयात दाखल करण्याची परवानगी मागितली होती. हे वाचा - BREAKING : हैदराबादमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू 11 जणांना अटक पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारनं एडीजी ज्ञानवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकही स्थापन केलं आहे. या संपूर्ण प्रकरणावरून गावात सध्या तणावाचं वातावरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात