नवी दिल्ली, 24 मार्च : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज दुपारी बीरभूम हिंसाचारातील (Birbhum Violence) बोगतुई गावात पोहोचल्या, जिथं मंगळवारी जमावानं 10 जणांना जिवंत जाळलं. आता या निर्दयी हत्याकांडाच्या (Birbhum Massacre) राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राज्य सरकार हिंसाचार आणि अराजकाला मोकळं रान देत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. हत्याकांडाच्या तिसऱ्या दिवशी बोगतुई गावात पोहोचलेल्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी या हत्यांमागे काहीतरी 'खूप मोठं षडयंत्र' असल्याचं म्हटलं आहे.
आजच्या बंगालमध्ये एवढ्या निर्दयीपणे हत्या होऊ शकतात, असं मला कधी वाटलं नव्हतं, असं बॅनर्जी म्हणाल्या. या हत्याकांडात महिला आणि लहान मुलं मारली गेली. कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला. पण या हत्याकांडानं माझ्या मनात तीव्र वेदना होत आहेत, असं त्यांनी म्हटलं.
West Bengal CM Mamata Banerjee reaches Bagtui village, Rampurhat to meet the kin of those who were killed in the Birbhum violence. pic.twitter.com/Xk2iri2nAj
— ANI (@ANI) March 24, 2022
बॅनर्जी यांनी या घटनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करतील आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी येथील पोलीस अधिकाऱ्यालाही बोलावून घेत या प्रकरणाचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले. तसंच, यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
हे वाचा - 'इतर राज्यांतही असं घडतं' Birbhum Viloence वर ममतांचं वक्तव्य
'मला कोणत्याही प्रकारची गय नको. या हत्याकांडाला जे जबाबदार आहेत, त्या लोकांना अटक व्हावी आणि ज्या पोलिसांची चूक झाली आहे त्यांना शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं. घटनेशी संबंधित साक्षीदारांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, असंही त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mamata banerjee, Violence, West bengal