Home /News /mumbai /

जगाला हादरविणाऱ्या व्हायरसचे आहेत 30 प्रकार, असा आहे भारतातला कोरोना

जगाला हादरविणाऱ्या व्हायरसचे आहेत 30 प्रकार, असा आहे भारतातला कोरोना

चीनमधून हा व्हायरस जगभर घेल्यानंतर त्याने जाताना स्वत:मध्ये बदल घडवून आणला. त्यामुळे त्याच्या संरचनेत आणि क्षमतेतही बदल झाला आहे.

    मुंबई 22 एप्रिल: डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका व्हायरसने सर्व जगाला घरात बंद करून टाकलं आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी सर्व जगभर संशोधन सुरू आहे. हा व्हायरस आहे कसा? त्याचा प्रसार कसा होतोय? तो बदलतोय का? तो किती ताकदवान आहे यावर संशोधन सुरू आहे. ज्या चीनमध्ये तो सापडला त्या चीनमध्येच कोरोना व्हायरसचे 30 प्रकार आढळले आहेत. SARS CoV-2 या प्रकारातला हा व्हायरस असून त्याने जगभरातल्या 25 लाखांपेक्षा जास्त लोकांना ग्रासले आहे. चीनच्या होनजोऊ इथल्या झेजियांग विद्यापीठाच्या प्रोफेसर ली लांजुआन यांनी आणि त्यांच्या टीमने यावर संशोधन केलं आहे. ली यांनी सांगितलं की हा व्हायरस स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. त्याची जगाने फारशी दखल घेतली नाही. आणि या बदलामुळेच जगभर संशोधनात अडचणीही येत आहे. चीनमध्येच या व्हायरसचे 30 वेग वेगळे प्रकार आढळले आहेत. चीनमधून हा व्हायरस जगभर घेल्यानंतर त्याने जाताना स्वत:मध्ये बदल घडवून आणला. त्यामुळे त्याच्या संरचनेत आणि क्षमतेतही बदल झाला आहे. या बदलामुळे त्याची ताकद वाढली आणि कमीही झाली. हा व्हायरस जेव्हा शरिरात प्रवेश करतो तेव्हा तो पेशींवर हल्ला करतो. हा हल्ला किती मोठा आहे हे त्या व्हायरसच्या क्षमतेवर किंवा प्रकारावर अवलंबून आहे. हे वाचा -डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही, नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय भारतात ICMR यावर संशोधन करत आहे. भारतात एकाच टाईपचा व्हायरस आहे. त्याने स्वत:मध्ये बदल करून घेतलेला नाही असं मत ICMRच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. जगभर आत्तापर्यंत तब्बल 1 लाख 70 हजार लोकांचा बळी या व्हायरसने घेतला आहे. हेही वाचा - पोलीस विरुद्ध स्थानिक पुन्हा उडाला भडका; पाहा दगडफेकीचा अस्वस्थ करणारा VIDEO कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरतंय जीवघेणं
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या