नवी दिल्ली 22 एप्रिल: देशात कोरोनाचा प्रसार वाढतोच आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 486 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 471 एवढी झाली आहे. तर 24 तासांमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या 652 झाली आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. 3 मेरोजी देशभरातला लॉकडाऊन संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती काय असेल यावर या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावलं उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. हे वाचा - सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या बुधवारचे दर पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. पंतप्रधानांनी याआधी 3 मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करत काही ठिकाणी अटी शिथिल केल्या होत्या. 20 एप्रिलनंतर निंर्बंध थोडेफोर शिथिल केले गेले. ज्या परिसरात जास्त कोरोनाचे रुग्ण नाही, त्या भागाचे झोन तयार करून उद्योगांना अटीशर्थींवर सुरुवात करण्याची मुभा देण्यात आली होती. राज्य सरकारने ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन अशी विभागणी करून राज्यात व्यवहार सुरू केले आहे. यात रेड झोनमधील जिल्ह्यात बंदी कायम आहे. हे वाचा - कॅनडीयन पंतप्रधानांच्या अदांवर लाखो तरूणी घायाळ, स्लो मोशन मधला VIDEO व्हायरल अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवलाय. 45 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 लाख 26 हजार जणांना कोरोनाची लागण झाली. जगात सर्वात शक्तिशाली असलेल्या अमरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसलाय. दुहेरी संकटात सापडलेल्या अमेरिकेला सावरण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेचे उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. अमेरिका सुरक्षीतपणे पुर्वपदावर येत आहे. आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा खुली करत आहोत. देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची आम्ही काळजी घेत होतो आणि घेत राहू त्याला आमचं प्राधान्य आहे. त्यांच्या जीवांची आम्हाला सर्वात जास्त काळजी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.