जाहिरात
मराठी बातम्या / देश / अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी आर्थिक संकटात! परिस्थितीमुळे शाळाही सुटली

अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी आर्थिक संकटात! परिस्थितीमुळे शाळाही सुटली

अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी आर्थिक संकटात! परिस्थितीमुळे शाळाही सुटली

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांची बिहारमधील मुलगी आर्थिक संकटात आहे. तिला परिस्थितीमुळे सध्या शाळेत देखील जाता येत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा, 26 फेब्रुवारी : मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना त्यांच्या मुलीचा  विसर पडला आहे. बिहारची राजधानी पाटणाला (Patana) लागून असलेल्या दानापूरच्या जमसौत गावाचा विकास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda gates) यांच्यासह 2011 साली या गावाला भेट दिली होती. त्यावेळी आपल्या संस्थेच्या मदतीनं त्यांनी या गावाचं चित्र बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. इतकंच नाही तर या गावातील ज्या मुलीला दत्तक घेऊन त्यांनी तिच्या शिक्षणाचं वचन दिलं होतं, त्या मुलीचा परिवार देखील सध्या आर्थिक संकटात आहे. दानापूरमध्ये राहणाऱ्या राणीची ही गोष्ट आहे. राणीच्या आई वडिलांची अब्जाधीश बिल गेट्स, आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी भेट घेतली होती. गेट्स फाऊंडेशनच्या कामासाठी त्यांनी हा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी जमसौत गावाच्या विकासाचं आश्वासन दिलं होतं. इतकचं नाही, तर चिमुकल्या राणीला मांडीवर घेऊन तिचं शिक्षण आपण पूर्ण करणार असल्याची घोषणा केली होती. आज राणी 11 वर्षांची आहे. तिचं कुटुंब आर्थिक तंगीत आहे. त्यामुळे राणी शाळेत देखील जाऊ शकत नाही. मात्र मिलिंडा गेट्स फाऊंडेशनला याची कोणतीही कल्पना नाही. गेट्स फाऊंडेशननं दत्तक घेतलेल्या या गावामध्ये तसंच त्यांनी कडेवर घेतलेल्या मुलीच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ‘मला शिक्षण घ्यायचं आहे, पण अडचणींमुळे मी शिकू शकत नाही,’ असं राणी सांगते. ‘कुणीही विचारपूस केली नाही’ राणीच्या आई कुंती देवी यांना आजही तो दिवस आठवतो. ‘त्यांच्या चिमुकल्या राणीला गेट्स दाम्पत्यानं कडेवर घेतलं होतं. ते तिला आपल्या मुलीसारखं प्रेम करत होते. अमेरिकेतून खूप सारी लोकं आमच्या घरी आली होती. त्यांनी माझ्या मुलीला दत्तक घेतलं. ते खूप काही बोलत होते, आम्हाला त्यांची भाषा समजत नव्हती. ‘त्या’ दिवसानंतर आजपर्यंत आमची विचारपूस करण्यासाठी कुणीही आलं नाही,’ असं कुंती देवी सांगतात. (वाचा :  सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवूनही तुम्ही मिळवू शकता मोठा फायदा, कसं शक्य आहे? जाणून घ्या ) गेट्स फाऊंडेशन आणि बिहार सरकारमध्ये आरोग्य सुधारणांबाबत करार झाला होता. त्यानुसार गेट्स भारत दौऱ्यावर आल्यानंतर जमसौत गावात गेले होते. त्यांनी या गावाचा विकास करण्याचं आश्वासन दिलं होतं. आजही या गावातील बहुसंख्य लोकं निरक्षर आहेत. नव्या पिढीला शिक्षणाची पूर्ण सोय नाही. गेट्स फाऊंडेशननं 2011 साली दिलेल्या वचनांचा त्यांना विसर पडला आहे, अशी खंत येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात