सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवूनही तुम्ही मिळवू शकता मोठा फायदा, कसं शक्य आहे? जाणून घ्या

अनेकदा आपण बचत खात्यात पैसे जमा करत असतो. परंतु या बचत खात्यामध्ये देखील अनेक योजना असून यामधून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

अनेकदा आपण बचत खात्यात पैसे जमा करत असतो. परंतु या बचत खात्यामध्ये देखील अनेक योजना असून यामधून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

  • Share this:
 नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी :  अनेकदा आपण बचत खात्यात (Saving Account) पैसे जमा करत असतो. परंतु या बचत खात्यामध्ये देखील अनेक योजना असून यामधून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. साधारणपणे आपण बचत खात्यात पैसे ठेवतो किंवा त्याची एफडी (Fixed Deposit) करतो. पण बचत खात्यामध्ये देखील तुम्हाला एफडीप्रमाणे फायदा मिळतो हे माहीत आहे का? स्वीप इन फॅसिलिटी (Sweep in Facility) अंतर्गत तुम्हाला यामध्ये हा लाभ मिळत असतो. एसबीआय (SBI), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI), बँक ऑफ इंडिया (Bank of India), एक्सिस बँक (Axis Bank) या बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. विविध बँकेत याला वेगवेगळं नाव असून तुम्ही तुमच्या बँकेत याविषयी चौकशी करू शकता. स्‍वीप इन फॅसिलिटीमध्ये सरप्लस रक्कम एफडीमध्ये जमा होते    या योजनेमध्ये तुमच्या बचत खात्यातील विशिष्ट रक्कम सीमा ओलांडल्यानंतर या योजनेत जमा होते. तुम्हाला या रकमेवर एफडीप्रमाणे( FD) व्याजदर मिळतो. यामध्ये तुमच्या बचत खात्यात जमा असणाऱ्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळतेच. परंतु त्यावर जमा झालेल्या रकमेवर या योजनेच्या अंतर्गत एफडीप्रमाणे व्याज मिळते. त्यामुळं दुप्पट फायदा या योजनेतून ग्राहकांना मिळणार आहे. जास्त रक्कम असेल तर एकापेक्षा जास्त एफडी करू शकता    या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एफडीच्या लाभासाठी देखील विशेष रकमेचं लिमिट ठरवण्यात आलं आहे. यामुळं तुमची रक्कम वाढल्यास तुम्ही दुसरं खातं देखील उघडू शकता. यामुळं दुसऱ्या खात्यावर देखील तुम्ही या योजनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. (हे पहा :मोठी नोकरी सोडत वडिलांच्या दुकानाचा चेहरा बदलला, आता स्टार्टअपमधून मिळवलं यश) विविध बँकांमध्ये वेगवेगळ्या नावाने सुविधा सामान्यपणे अनेक बँकांमध्ये बचत खात्यालाच स्वीप इन फॅसिलिटी लिंक केली जाते. तर अनेक बँकांमध्ये यासाठी विगवेगळी खाती आहेत. SBI मध्ये सेविंग्‍स प्‍लस अकाउंट, HDFC मध्ये स्‍वीप इन फॅसिलिटी, बँक ऑफ इंडियात सेविंग्‍स प्‍लस स्‍कीम, ICICI बँकेत मनी मल्‍टीप्‍लायर अकाउंट यांसारख्या नावांनी ही योजना उपलब्ध आहे.  यासाठी प्रत्येक बँकेत वेगवेगळे नियम आणि अटी आहेत. मिनिमम बॅलन्स कमी झाल्यास रद्द होईल एफडी   बँक खात्यातील मिनिअम बॅलन्स जोपर्यंत योग्य आहे तोपर्यंत तुमच्या खात्यातील रक्कम ही स्वीप इन योजनेअंतर्गत एफडी होणार आहे. पण जर मिनिमम बॅलन्स कमी झाला तर तुमच्या रकमेवर मिळणारे व्याज हे साधारण बचत खात्याप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळं तुमचा मिनिमम बॅलन्स कमी झाल्यास या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
Published by:Aiman Desai
First published: