• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Gujarat Fire: गुजरातमध्ये अग्नितांडव; पोलीस स्टेशन परिसरात रात्री भीषण आग, 25 गाड्या जळून खाक

Gujarat Fire: गुजरातमध्ये अग्नितांडव; पोलीस स्टेशन परिसरात रात्री भीषण आग, 25 गाड्या जळून खाक

पोलीस स्टेशन परिसरात अग्नितांडव; भीषण आगीत 25 गाड्या जळून खाक (Photo : ANI)

पोलीस स्टेशन परिसरात अग्नितांडव; भीषण आगीत 25 गाड्या जळून खाक (Photo : ANI)

25 vehicles gutted in a fire: रात्री लागलेल्या आगीत तब्बल 25 वाहने जळून खाक झाली आहेत.

 • Share this:
  अहमदाबाद, 7 नोव्हेंबर : ऐन दिवाळीत गुजरातमध्ये अग्नितांडव (massive fire in gujarat) पहायला मिळालं. रात्री लागलेल्या आगीत तब्बल 25 वाहने जळून खाक झाली आहेत. गुजरातमधील खेडा शहरातील पोलीस स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. (25 vehicles gutted in fire at premises of Kheda Police Station Gujarat) न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, खेडा पोलीस स्टेशनच्या आवारात रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत 25 वानहे जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा आणि काही कारचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच सर्वच्या सर्व वाहनांनी पेट घेतला आणि सर्व गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. अहमदनगरमध्ये भाऊबीजेच्या दिवशी अग्नितांडव अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आयसीयू कक्षामध्ये 17 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू होते. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आग दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं, "अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणाना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. ही अत्ंयत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जारीर करण्यात येत असून दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल."
  Published by:Sunil Desale
  First published: