गोविंद कुमार, प्रतिनिधी गोपालगंज, 25 जुलै : लग्न झालेलं असतानाही प्रेमापोटी प्रियकरासोबत पळून जाण्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. सीमा हैदर सचिनसाठी पाकिस्तानातून भारतात आली, तर अंजू प्रियकराला भेटायला भारतातून पाकिस्तानात गेली. अशातच आता बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून लग्नानंतर काही दिवसांतच नवरी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. तिच्या नवऱ्याने तिचं बाहेर प्रेमप्रकरण सुरू होतं. त्या प्रेमाखातरच तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. लग्न थाटामाटात पार पडलेलं असताना, सारंकाही आलबेल सुरू असताना नवरीच्या या भूमिकेने तिच्या माहेरच्या मंडळींनाही मोठा धक्का बसला. मुलीच्या काळजीने ते कासावीस झाले आहेत. तर दुसरीकडे नवऱ्याने हे प्रकरण पोलिसांत दाखल केलं असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उचकागाव भागातील रघुआ गावचे रहिवासी भगवान मांझी यांचा मुलगा पंकज कुमार याचं लग्न बैकुंठपूर भागातील रायगडचे रहिवासी मुनीलाल मांझी यांची मुलगी अनिशा कुमारी हिच्याशी झालं होतं. 22 जून रोजी हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. पंकज आणि अनिशा 13 दिवस नवरा-बायको म्हणून एकाच खोलीत राहत होते, त्यांच्यात सर्वकाही आलबेल होतं. मात्र 7 जुलैला अचानक ही नवरी फरार झाली. प्रेमाखातर केले सात समुद्र पार! सीमाचीच नाही ‘यांची’ही लव्हस्टोरी आहे एकदम खास पंकजने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘हे घडण्याआधी अनिशाचे काका तिला भेटायला आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या जागी झोपायला गेले. मात्र दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि घरात नवी नवरीच नव्हती.’ तिचं इतर कोणासोबत प्रेमप्रकरण असल्याचा आरोपही पंकजने लावला. या प्रेमासाठीच ती पळून गेली असल्याचं तो म्हणाला. दरम्यान, पंकज हा एक मजूर आहे. मजुरी करून तो पत्नीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अचानक तिचा स्वभाव कधी बदलला आणि कधी ती घर सोडून गेली हे कळलंच नाही, असं सांगताना पंकज भावुक झाला होता.