Home /News /national /

निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात लिहिली डायरी, दिलं ‘दरिंदा’ असं शीर्षक; काय आहे त्या डायरीत

निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात लिहिली डायरी, दिलं ‘दरिंदा’ असं शीर्षक; काय आहे त्या डायरीत

दोषी विनयने 19 पानी डायरी लिहिली असून त्याला 'दरिंदा' असं शीर्षक दिलं आहे

    नवी दिल्ली, 26 जानेवारी : तिहार तुरुंग प्रशासनाने निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींच्या विविध वस्तू वकीलांकडे सुपूर्द केल्या आहेत. दोषींची बाजू लढणारे वकील ए.पी.सिंह यांनी सांगितल्यानुसार दोषींच्या काही वस्तू या काल रात्री 10.30 पर्यंत देण्यात आले. मात्र दोषी विनय शर्माची डायरी अद्याप देण्यात आलेली नाही. वकीलांच्या म्हणण्यानुसार ही डायरी 160 पानी असून त्याचा मेडिकल रिपोर्टही अद्याप देण्यात आलेला नाही. विनय़ याची तब्येत बरी नसून त्याला तुरुंगात विष (Slow Poison) दिल्याचा आरोप दोषींच्या वकीलाने केला आहे. विनयचा हात फ्रॅक्चर झाला असून तो गेल्या सात दिवसांपासून उपोषण करीत आहे. यासंदर्भात मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर नेमकं स्पष्ट होईल. त्वरित आदेश द्या, कोर्टाला सांगितले दोषींचे वकील ए.पी.सिंग यांनी पतियाळा हाऊस कोर्टासमोर (Patiala House Court) दाखल केलेल्या याचिकेत विनय शर्माच्या दया याचिका आणि विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांच्या कागदपत्रांची विनंती करण्याबाबत तातडीने कोर्टाचे आदेश मागितले आहेत. अहवालानुसार, दोषींच्या अर्जात म्हटले आहे की, 'बर्‍याच विनंत्या करूनही विनय शर्माला दोषी ठरवण्यासंबंधित कागदपत्रे पुरवली गेली नाहीत. आता संबंधित तुरूंगातील अधीक्षकांकडून पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूरसा अशीच कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात. एकाने घेतली फाशी, एक निघाला अल्पवयीन, 4 जणांना देणार फाशी निर्भया प्रकरणात कोर्टाने नुकताच दोषींवर डेथ वॉरंट जारी करुन 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित केली आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीच्या वसंत विहार येथे फिरत्या बसमध्ये 23 वर्षीय निर्भयावर निर्घृण सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या बलात्कारात राम सिंह यांच्यासह सहा जणांचा सहभाग होता. यामध्ये मुख्य आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन मुलाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case, Supreme court, Tihar jail

    पुढील बातम्या