मराठी बातम्या /बातम्या /देश /हत्तीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती करणाऱ्या अख्तर इमामची हत्या, हल्लेखोरांनी भरदिवसा झाडल्या गोळ्या

हत्तीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती करणाऱ्या अख्तर इमामची हत्या, हल्लेखोरांनी भरदिवसा झाडल्या गोळ्या

हत्तीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती करणाऱ्या 'हाती काकांची' गोळ्या झाडून हत्या

हत्तीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती करणाऱ्या 'हाती काकांची' गोळ्या झाडून हत्या

Elephant man Akhtar Imam killed: आपली कोट्यवधी रुपयांची संप्ती हत्तींच्या नावावर करणाऱ्या इसमाची हत्या करण्यात आली आहे.

पाटणा, 4 नोव्हेंबर : हत्तींचा सरदार अशी ओळख असलेल्या आणि आपल्या हत्तींच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती करणाऱ्या अख्तर इमाम (elephant man Akhtar Imam) यांची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या (Akhtar Imam shot dead) केली. ही घटना बिहारमधील (Bihar) दानापूरच्या फुलवारीशरीफ परिसरात घडली आहे.

असं म्हटलं जात आहे की, अक्तर इमाम यांच्या पाठीत एकामागे एक अशा एकूण आठ गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जमीनीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून अख्तर इमाम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हत्तींच्या नावावर 5 कोटींची संपत्ती

बिहारमध्ये अख्तर इमाम यांना हत्तींचा सरदार, हत्तींचा मुखिया म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, अख्तर इमाम यांनी आपल्या हत्तींच्या नावावर जवळपास 5 कोटींची संपत्ती केली आहे. आपल्या हत्तींच्या नावावर संपत्ती केल्याने अख्तर इमाम हे चर्चेत आले होते.

वाचा : नाशकात पूजा आंबेकरची हत्या, 20 ते 25 वेळा चाकू खूपसून घेतला जीव

अख्तर इमाम हे बुधवारी आपल्या हत्तींसाठी बांधण्यात आलेल्या शेडमध्ये काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकामागे एक अशा एकूण 8 गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. या हल्ल्यात अख्तर इमाम गंभीर जखमी झाले होते त्यांना स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

अख्तर इमाम यांच्या हत्येप्रकरणी फुलवारीशरीफचे एएसपी मनीष कुमार म्हणाले, आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. प्रत्येक अँगने तपास सुरू केला आहे. ज्या पद्धतीने गोळ्या झाडण्यात आल्या आहेत त्यावरुन हे कृत्य कॉन्ट्रॅक्ट किलरने केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी आममचा तपास सुरू आहे.

दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला; 8 जणांचा संशयास्पद मृत्यू

गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death) झाला आहे. ही घटना बिहारमधील बेतिया (Betiya Bihar) येथे घडली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death of 8 people) झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

बेतिया येथे एकाचवेळी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषारु दारु प्यायल्याने या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder