मराठी बातम्या /बातम्या /देश /दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला; 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज

दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला; 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज

ऐन दिवाळीत आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ

ऐन दिवाळीत आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ

Eight people lost life: ऐन दिवाळीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : संपूर्ण देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death) झाला आहे. ही घटना बिहारमधील बेतिया (Betiya Bihar) येथे घडली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death of 8 people) झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

बेतिया येथे एकाचवेळी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषारु दारु प्यायल्याने या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होती. बेतिया येथे काही जणांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले. त्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडू लागली आणि यातच 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा : मुलांना फटाक्यांपासून सांभाळा, Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

ही घटना नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणेकडील तेलहुआ गावात घडली आहे. मृतकांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक 2, 3 आणि 4 मधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गावातील या सर्वांनी दारूचे सेवन केले आणि त्यानंतर रात्री उशीरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली. यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच रुग्णालयात एक-एक करुन मृत्यू होई लागले. मृतकांची नावे समोर आली असून त्यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहनर सहनी, उमा साह, रमेश सहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे.

वाचा : नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, आईसह मुलगा-मुलीचा मृत्यू

गोपालगंजमध्येही विषारी दारूचे 8 बळी

बिहारमधील गोपालगंज येथे विषारी दारू प्यायल्याने मृतकांचा आकडा वाढला आहे. विषारी दारू प्यायल्याने गुरुवारी 55 वर्षीय दुर्गा शर्माचा मृत्यू झाला. त्यामुळे यविषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त सिधवलिया येथील मंगोलपूर परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच बैकुंठपूरचे माजी आमदार आणि जदयू नेते मंजीत सिंह हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. मोहम्मदपूर गावा आणि कुशहर गावात विषारी दारू प्यायस्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आता मृतकांची संख्या 6 झाली आहे.

First published:

Tags: Bihar, Diwali 2021, Illegal liquor