पाटणा, 24 मार्च : कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाल्यानंतर रुग्णांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास ही तर सामान्य समस्या झाली पण अनेकांना याशिवाय अनेक त्रास होत आहेत आणि असाच त्रास असह्य झाल्याने एका कोरोना योद्धानेच आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बिहारमध्ये (Bihar) कोरोना झालेल्या डॉक्टराने आत्महत्या (Doctor sucide after corona infection) केली आहे.
बिहारच्या गिद्धौरमधील सार्वजिनिक आरोग्य केंद्रातील 63 वर्षांचे डॉ. रामस्वरूप चौधरी यांनी मंगळवारी आत्महत्या केली आहे. सरकारी आवासात त्यांनी पंख्याला गळफास घेतला. डॉ. रामस्वरूप हे मूळचे सिंघपूरच गावचे. सहा वर्षांपासून ते गिद्धौरच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांना कोविड केअर सेंटरची जबाबदारी देण्यात आली. याचदरम्यान त्यांना कोरोना झाला. तेव्हापासून ते खूप त्रासले होते.
हे वाचा - कोरोनातून वाचली मात्र लेकानेच सोडला हात, पुण्यातील आजीची वेदनादायी कहाणी
रामस्वरूप यांनी मंगळवारी सकाळी आपले सहकारी आणि विभागातील काही लोकांसोबत फोनवर चर्चा केली. त्यानंतर चहानाश्ता करून ते रुग्णालयात जाण्याची तयारी करण्यासाठी आपल्या खोलीत गेले. त्यांचा ड्रायव्हर त्यांना घेण्यासाठी घरी पोहोचला. पण ते आपल्या खोलीतून बाहेर आलेच नाही. मग ड्रायव्हर. डॉक्टराची पत्नी आणि मुलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंद होता. दरवाजा तोडल्यानंतर त्यांचं शरीर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळलं, असं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.
हे वाचा - धारावी नव्हे हा उच्चभ्रू परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; मुंबईकरांनो इथं जाणं टाळा
डॉक्टर रामस्वरूप यांच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली. त्यात लिहिलं होतं, कोरोना झाल्यानंतर माझी स्मृती काम करत नाही आहे, झोपही लागत नाही, वेड लागल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी जीव देतो आहे, असं या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला पाठवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Suicide