मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

धारावी नव्हे तर आता हा उच्चभ्रू परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; मुंबईकरांनो इथं जाणं टाळा

धारावी नव्हे तर आता हा उच्चभ्रू परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; मुंबईकरांनो इथं जाणं टाळा

Coronavirus hotspot in mumbai : गेल्या वर्षी धारावीत थैमान घालणाऱ्या कोरोनाने यावर्षी दुसऱ्या भागाकडे कूच केली आहे.

Coronavirus hotspot in mumbai : गेल्या वर्षी धारावीत थैमान घालणाऱ्या कोरोनाने यावर्षी दुसऱ्या भागाकडे कूच केली आहे.

Coronavirus hotspot in mumbai : गेल्या वर्षी धारावीत थैमान घालणाऱ्या कोरोनाने यावर्षी दुसऱ्या भागाकडे कूच केली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 24 मार्च : गेल्या वर्षी कोरोनाने मुंबईच्या (Coronavirus in Mumbai) धारावीत थैमान घातलं होतं. संपूर्ण धारावीला आपल्या विळख्यात घेतलं होतं. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि आता धारावीसारख्या (Coronavirus new hotspot in Mumbai) झोपडपट्टी परिसराऐवजी आता उच्चभ्रू परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीऐवजी आता कोरोनाने अंधेरी भागाकडे कूच केली आहे. जिथं बहुतेक बॉलिवूड स्टार्स राहतात अशाच भागात कोरोनाचे सर्वात जास्त केसेस आहेत.

सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेले देशातील दहापैकी नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यात मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.  मंगळवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत 3,512 नवे कोरोना रुग्ण आढळले त्यानंतर आता एकूण 3,69,426 रुग्णांची नोंद झाली आहे.  मुंबईतील अंधेरी पश्चिम भाग हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. शहरातील 24 वॉर्ड्समध्ये या प्रभागात सर्वात जास्त कोरोना केसेस आढळून आले आहेत. अंधेरीत दररोज 200 ते 300 रुग्ण आढळून येत आहेत, सोमवारी तर जवळपास 300 रुग्णांचीच नोंद झाली. आठवड्यातील रुग्णवाढीचा दर हा 0.97% आहे.

हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा 'ताप'; 9 जिल्ह्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

त्यामुळे आता प्रशासन लवकरच जुहू बीच बंद ठेण्याच्या तयारीत आहे.  जुहू बीचवर क्लिनअप मार्शल्स तैनात करण्यात आले आहे. मास्कशिवाय दिसणाऱ्यांना दंड आखारला जात आहे. सोमवारपासून तिथं अँटिजेन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. तसंच परिस्थिती गंभीर झाल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी पालिकेचे सहआयुक्त माहिती विश्वास मोटे यांनी दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हे वाचा - मुंबईसह या राज्यांमध्येही होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी; जाणून घ्या नियम

मुंबईत आतापर्यंत 11,600 मृत्यूची नोंद झाली आहे. 3,29,234 रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या आता 27,672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील वाढती कोरोना प्रकरणं पाहता बीएमसीने खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. तरीदेखील कुणी हे सण साजरे करताना दिसलं तर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही पालिकेने दिला आहे.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Dharavi, Maharashtra, Mumbai